Heart Attack And Cardiac Arrest: हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय असतो फरक; 'हे' उपाय करून राहा निरोगी

author img

By

Published : Mar 5, 2023, 10:38 AM IST

Heart Attack And Cardiac Arrest

प्रतिक्रिया देताना डॉ. अनुप ताकसांडे

जिम करताना तसेच खेळताना काही लोकांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे आपण ऐकले आहे. नुकताच अहमदाबाद येथील एका क्रिकेटरला खेळताना हार्ट अटॅक आला आहे. डायटचे फॅड, शरीराला अधिक श्रम, ताण दिल्याने ह्रदयविकाराचे झटके येतात. यासाठी एक्सरसाइज, फिटनेस करण्यापूर्वी हृदयाची तपासणी तसेच योग्य प्रकारचा आहार घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

मुंबई : हार्ट अटॅक आणि कार्डियाक असे हृदय विकाराचे दोन प्रकार आहेत. हृदयाला कोरोनरी धमन्यांद्वारे रक्त पुरवठा केला जातो. धमन्यांमध्ये ब्लॉकेजेस झाल्याने हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होऊन हार्ट अटॅक येतो. मानसिक, शारीरिक ताणतणाव असलेल्या जीवन शैलीमुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो. धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि फॅमिली हिस्टरी असलेल्याना हार्ट अटॅक येतो. कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक बंद पडते. हृदयाची रक्त पाठवण्याची क्रिया थांबल्यावर ते बंद पडून रुग्णाचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सर्व्हेनुसार कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूपेक्षा चौपटीने जास्त आहे.त्यामुळे दुर्घटना टळू शकतात : जिम फिटनेस करताना कमी वयात स्नायू बळकट बनवणे, सिक्स पॅक डेव्हलप करणे, यासाठी डायटचे फॅड, शरीराला सवय नसताना अधिक श्रम, त्राण दिल्याने हृदयाच्या धमन्यांमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता असते. किंवा अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने नसा फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टेप बाय स्टेप म्हणजेच हळूहळू आपला स्टॅमिना डेव्हलप करणे गरजेचे असते. जिम किंवा फिटनेस ऍक्टिव्हिटी करण्यापूर्वी आपल्या हृदयाची तपासणी करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे दुर्घटना टळू शकतात, असे मीरारोड येथील वोकार्ड हॉस्पिटलचे कन्सल्टंट इंटर्वेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप ताकसांडे यांनी सांगितले.


डा्एटवर विशेष लक्ष द्या : कोणीतही गोष्ट जास्त खाणे हे विषासारखे असते. फिटनेस डायट, प्रोटीन खाण्यापेक्षा योग्य प्रकारचे अन्न खाणे योग्य आहे. जेवणात तळलेले पदार्थ, जास्त प्रमाणात मीठ, साखर, मैदा तसेच सॅच्युरेटेड फॅट पदार्थ कमी ठेवावे. जेवणात हिरव्या पालेभाज्या, स्प्राउट्स, फळे खावीत. यातून ३० ते ४० टक्के कॅलरी मिळते. डायटवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे डॉ. अनुप ताकसांडे यांनी सांगितले. ज्या लोकांना यापूर्वी कधीही हृदयासंदर्भात कोणताही त्रास नव्हता. मात्र फिटनेस करताना, मॅरेथॉनमध्ये धावताना अशा लोकांचा मृत्यू झाला आहे. हे लोक ४० च्या वयाचे होते, असे आपण नेहमीच बातम्यांमधून आणि सोशल मीडियावर ऐकतो. यामध्ये सेलिब्रिटी, मीडिया पर्सनॅलिटी, स्पोर्ट्स पर्सनॅलिटी यांचा समावेश आहे.हेही वाचा : Maharashtra Politics: मुंबईत आजपासून युती सरकारची आशीर्वाद यात्रा; जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.