ETV Bharat / state

Kirit Somaiya Criticized Anil Parab: किरीट सोमैयांचा अनिल परबांवर पलटवार; वांद्रेतूनही घेतला काढता पाय

author img

By

Published : Jan 31, 2023, 6:03 PM IST

वांद्रे येथील म्हाडाच्या जागेच्या पाहणीसाठी हट्टाला पेटलेल्या किरीट सोमैयांना शिवसेना नेते अनिल परब यांनी थेट आव्हान दिले. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता, पोलिसांनी सोमैयांना आज (मंगळवारी) बीकेसी बीट चौकीजवळ रोखून धरले. परब यांनी कार्यालय वाचवण्यासाठी खूप खटाटोप केला. आता कारवाई झाली, असा पटलावर करत वांद्रेला जाणार नाही, अशी भूमिका घेत सोमैयांनी बीकेसीतून काढता पाय घेतला.

Kirit Somaiya Criticized Anil Parab
किरीट सोमय्या

मुंबई : वांद्रे येथील अनिल परब यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे सकाळी पाडकाम केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे कार्यालय पाडण्यासाठी किरीट सोमैयांनी पाठपुरावा केला होता. दरम्यान, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर टीकास्त्र सोडले. तसेच वांद्रे येथे आल्यावर शिवसेना स्टाईल स्वागत करू, असा इशारा दिला होता. किरीट सोमैयांनी यावर प्रतिक्रिया दिली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. सकाळपासून पोलिसांकडे चौकशी सुरू आहे.

बीकेसीतून काढता पाय : लोकायुक्ताच्या सुनावणीवेळी निर्णय झाला असून त्याच निर्णयाचे पालन होत आहे. जून 2019 मध्ये अनिल परब यांनी नोटीस दिली होती. त्यानंतर आता कार्यालयाचे तोडकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम म्हाडा पूर्ण करणार आहे, असे सोमैयांनी सांगितले. तसेच हे कार्यालय ज्यांनी बांधले आणि त्या कार्यालयामध्ये वीज कुठून येत होती. त्याला एमआरटीपी लागू करावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, कार्यालय वाचवण्यासाठी परब यांनी प्रचंड खटाटोप केला. अखेर कारवाई झाली. आता मी माझा मोर्चा उरलेल्या साई रिसॉर्टकडे आणि अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे वळवणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, वांद्रेला जाणार नाही का, असा प्रश्न विचारला असता नकार देत बीकेसीतून काढता पाय घेतला.

मराठी माणूस आता आठवला का? : मराठी माणसाला उद्धस्त करण्याचा घाट किरीट सोमैया आखत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. यालाही सोमैयांनी प्रत्युत्तर दिले. आता तरी त्यांना मराठी माणूस आठवला ही चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा रिसॉर्ट बांधला, त्यामध्ये करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पैसा टाकला. तसेच 100 कोटींची सचिन वाझे यांच्याकडून वसूल करताना त्यांना मराठी माणूस नाही आठवला का, असा सवाल सोमैयांनी केला. तसेच वसूलीसाठी त्यांनी निर्दोष नागरिकांची हत्या केल्याचा आरोप ही केला. आता कितीही सबब दाखवली तरी काय फायदा होणार नाही, अशा शब्दांत सोमय्या यांनी पलटवार केला.

किरीट सोमैयांची मागणी : काळ्या यादीत टाकलेल्या रुग्णालयाला पुन्हा कोविडच्या कामाचे कंत्राट असे काय देण्यात आले? 18 कामांचे कंत्राट एखाद्या रुग्णालयाला कसे दिले जाऊ शकते? याबाबत पी.एम.आर.डी.ए तसेच मुंबई महानगरपालिकेची चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी जानेवरी, 2023 रोजी केली होती.

कंत्राट वाटपात हेराफेरी : कोविड 2019 मध्ये राज्यातील अनेक रुग्णालयांना कोविड सेंटर चालवण्यात देण्यात आले होते. मात्र सुजित पाटकर लाईफ लाईन सेंटरमध्ये घोटाळा झाला होता. यांना कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले यामध्ये ते दोषी आढळल्यानंतर त्यांना काळ्या यादी टाकण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्यांना अठरा ठिकाणी कोविड सेंटर देण्यात आले होते. त्यावर भाजपनेते किरीट सोमैया यांनी चौकशीची मागणी केली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडे : सुजित पाटकर यांच्या शंभर कोटीच्या कोविड घोटाळ्याप्रकरणी पीएमआरडीएने त्यांना कसे कंत्राट मंजूर केले? महापालिकेने त्यांना कशी कामे दिली? यासंदर्भात मुंबई आर्थिक गुन्हा शाखेने चौकशी करावी. तसेच इडीने देखील या संदर्भात चौकशी करावी, अशी आपण विनंती केल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली होती.

100 कोटींचा घोटाळा : कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला होता. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करण्यात आले होते. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली होती.

चौकशीची मागणी : कोरोना काळात १०० कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमैयां यांनी महविकास आघाडीवर केला होता. संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांनी कोविड सेंटर चुकीच्या मार्गाने मिळवले असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. याबाबत झालेल्या चौकशीचा अहवाल महानगर पालिकेकडून आला आहे. महानगरपालिकेचे सह आयुक्त सुधीर धामणे यांनी हा अहवाल सादर केला होता. या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही यामध्ये कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे सहआयुक्त सुधीर धामणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करून त्यांचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केली होती.

हेही वाचा : Asaram Bapu Sentenced Life Imprisonment: बलात्कार प्रकरणात वादग्रस्त आसारामला जन्मठेपेची शिक्षा.. न्यायालयाचा निकाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.