ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड वादग्रस्त वक्तव्यामुळं सतत वादाच्या भोवऱ्यात, आव्हाड आणि वाद काय आहे समीकरण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 9:32 PM IST

Jitendra Awhad: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाडांच्या रामाविषयी वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद आणि जितेंद्र आव्हाड हे समीकरणच जणू ठरलेलं आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (God Ram) याआधी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळं ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं होतं. (controversial statement) आपण पाहूया याआधी कोणकोणती वादग्रस्त वक्तव्यं आव्हाडांनी केली आहेत.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी अरुण सावंत यांची प्रतिक्रिया

मुंबई Jitendra Awhad: आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त वक्तव्य शिर्डी येथील शिबिरात केलं आहे. “राम शिकार करायचा आणि मांसाहार खायचा, मग राम शाकाहारी कसा? (Saint Tukaram) रामानं वनवासात 14 वर्ष काढली, तिथं काय शाकाहारी आहार मिळाला असेल का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. यानंतर आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत असून, त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलनं केली जात आहेत. (Shivaji Maharaj)


जितेंद्र आव्हाडांची काय आहेत वादग्रस्त वक्तव्य?


1) जगत्‌गुरु तुकाराम महाराज: जगत्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याविषयी जुलै 2018 मध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुकाराम महाराज यांचा खून झाला होता. या वक्तव्यानंतर आव्हाडांवर प्रचंड टीका झाली होती. वारकरी संप्रदायाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. यानंतर त्यांनी माफी मागितली होती.


2) छत्रपती शिवाजी महाराज: मार्च 2023 मध्ये जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढला तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं महत्त्व उरणार नाही. अफझलखान, औरंगजेब आणि शाहिस्तेखान होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून आला. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसला नसता. यावेळी देखील आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले होते आणि त्यांच्यावर समाजातून टीका झाली.


3) मग अण्णा हजारे गप्प का? देशात काँग्रेसचं सरकार असताना अण्णांनी दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात आंदोलनं केली. यानंतर काँग्रेसचं सरकार गेलं; पण आता जगभर प्रसिद्ध असलेले समाजसेवक अण्णा हजारे भाजपा विरोधात शांत कसे? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला होता. यावेळी त्यांच्यावर भाजपाने टीका केली होती आणि आव्हाड चर्चेत आले होते.


4) आणीबाणीने गळा घोटला: 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाहीचा गळा घोटला, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी 2020 मध्ये केलं होतं. यानंतर त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.


5) अल्ला को 2011 में पता था: जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा फेब्रुवारी 2021 मध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं. 'अल्लाला 2011 मध्ये माहित होतं की, 2020 मध्ये कोरोना येणार. म्हणून 2019 रोजी मुंब्र्यात नवीन कब्रस्तान बनविलं आहे.' आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले.


6) छत्रपती संभाजीराजेंना बदनाम करण्याचं काम: सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीनं संभाजीराजे हे रग्गेल आणि रंगेल होते. तसेच ते स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. यावेळी त्यांच्यावर संभाजी ब्रिगेड आणि भाजपानं टीका केली होती.


7) औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता: जानेवारी 2023 मध्ये आव्हाडांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केल्यानंतर तेव्हा नव्या वादाला तोंड फुटलं होतं.


आव्हाड म्हणजे विकृत माणूस - शिंदे गट : आमदार जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामांवर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना (शिंदे गट), भाजपा तसेच अजित पवार गट आक्रमक झाला आहे. घाटकोपरमध्ये आव्हाडांविरोधात भाजपा आमदार राम कदमांनी आंदोलन केलं तर जितेंद्र आव्हाड हे सतत काही ना काही चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत असतात. जितेंद्र आव्हाड म्हणजे विकृत माणूस आहे, अशी बोचरी टीका शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. मेरे पास ये है, वो है, तुम्हारे पास क्या है? उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं
  2. पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मालदीवचे तीन मंत्री निलंबित
  3. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी करावी -रविंद्र चव्हाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.