ETV Bharat / state

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले; अद्यापही 57 बेपत्ता, 27 मृत्यू

author img

By

Published : Jul 23, 2023, 7:06 PM IST

एनडीआरएफने इर्शाळवाडी येथे शोध आणि बचाव मोहीम थांबवली आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले असून, आणखी 57 जण बेपत्ता आहेत.

Irshalwadi Landslide
इर्शाळवाडी भूस्खलन

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी झालेल्या भूस्खलनात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अखेर शोध आणि बचाव मोहीम थांबवली आहे. राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

  • Maharashtra | Raigad landslide rescue operation called off.

    As decided by District Administration, other senior officials, & as briefed by Minister Uday Samant, the rescue operations has been called off and closed. Details of missing and the deceased can be obtained from the… https://t.co/7oodwllwg7

    — ANI (@ANI) July 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एका मृतदेहाची ओळख पटली नाही : पत्रकार परिषदेला संबोधित करताना रायगडचे पालकमंत्री सामंत म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित अधिकारी तसेच स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले असून, आणखी 57 जणं बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी ढिगाऱ्यातून एकही मृतदेह सापडला नाही. मृतांमध्ये 12 पुरुष, 10 महिला आणि 4 लहान बालकांचा समावेश आहे. तर एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. बेपत्ता आणि मृतांचा तपशील प्रशासनाकडून मिळू शकतो.

भूस्खलनात 17 घरे गाडली गेली : मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या इर्शाळवाडी या दुर्गम आदिवासी गावात 19 जुलै रोजी रात्री 10:30 च्या सुमारास भूस्खलन झाले. भूस्खलनात गावातील 48 पैकी किमान 17 घरे पूर्ण किंवा अंशत: गाडली गेली आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर बचाव पथकांनी येथे रविवारी चौथ्या दिवशी शोध आणि बचाव कार्य पुन्हा सुरू केले. शनिवारी संध्याकाळी अंधार आणि खराब हवामानामुळे ते थांबवण्यात आले होते.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर : दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला होता. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. इर्शाळवाडी येथे मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

अनाथ झालेल्या बालकांना मुख्यमंत्री दत्तक घेणार : शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, ते भूस्खलनात आई-वडील गमावलेल्या बालकांना दत्तक घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे 2 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील अनाथ मुलांची काळजी घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्तक घेणार
  2. Uddhav Thackeray Birthday : वाढदिवस साजरा न करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय, ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
  3. Chandepatti village: दरड कोसळण्याच्या भीतीने चांदेपट्टी गावातील नागरिकांचे स्थलांतर ...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.