ETV Bharat / state

International yoga day 2023 : योगदिनानिमित्त देशभरात उत्साह,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी  योगदिनात घेतला सहभाग

author img

By

Published : Jun 21, 2023, 7:19 AM IST

Updated : Jun 21, 2023, 8:42 AM IST

International yoga day 2023 celebration
आंतरराष्ट्रीय योग दिन

चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असलेला योगाचे महत्त्व कळण्यासाठी आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. भारताकडून जगाला योगाचे महत्त्व कळाले आहे. त्यामुळे भारतात महाराष्ट्रासह विविध राज्यात योगदिन साजरा करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी व योगप्रेमींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

मुंबई: जगभरात आज नववा आंततराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहेत. गे वे ऑफ इंडियावर योग दिन साजरा करण्यात येत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी झाले आहेत. तर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील योग दिनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विविध योगासने केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, गुरुग्राममध्ये भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी योगदिनात सहभाग घेतला आहे. हरिद्वारमधील पंतजली योगपीठामध्येदेखील मोठ्या प्रमाणात योग दिन साजरा केला जात आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाच्या जवानांबरोबर योगासने केली आहेत. ही योगासने स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर करण्यात आली आहेत. यामध्ये नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, नौदल कल्याण आणि कल्याण संघटनेचे अध्यक्ष कला हरी कुमार यांच्यासह भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले. या कार्यक्रमात अग्निवीरांसह सशस्त्र दलाचे जवानदेखील सहभागी झाले होते. यावेळी योग प्रशिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. 'ओशन रिंग ऑफ योग' या थीमवर भर देऊन भारतीय नौदल एक विशेष व्हिडिओ प्रसारित करणार आहे.

सांस्कृतिक मंत्रायलायकडून साजरा करण्यात येणार योग- हिंदी महासागर क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाच्या तुकड्या 'वसुधैव कुटुंबकम'चा संदेश देत मित्र देशांच्या विविध बंदरांना भेट देणार आहेत. 23 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ही भारताची थीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती केल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2014 मध्ये ठरावाद्वारे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मान्यता दिली. सांस्कृतिक मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सर्व संस्थांना मान्यताप्राप्त योग प्रोटोकॉलचे पालन करून पूर्ण सहभागासह नियमांचे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

योगाने होतो मन शरीराचा फायदा- अनेकांना कामाच्या व्यस्ततेमुळे नियमित योगासने करता येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वाय ब्रेक म्हणजे ऑफिसमधील खुर्चीवर योगा करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कर्मचारी तणावमुक्त, ताजेतवाने आणि कामाच्या ठिकाणी पुन्हा लक्ष केंद्रित करू शकणार आहेत. बाबा रामदेव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी योगाचे महत्त्व विषद केले आहे. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी, योगाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे. जिममध्ये फक्त स्नायू ताठ होतात. मात्र योगा हा शरीर आणि मन या दोन्हींसाठी चांगला असतो. स्नायू मजबुत करण्यासाठी प्रोटीन पावडर घेणे गरजेचे नाही. दूध, तूप आणि संबंधित पदार्थांचे सेवन करा, असा बाबा रामदेव यांनी सल्ला दिला आहे.

हेही वाचा-

  1. International Day of Yoga : पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांमध्ये साजरा करणार आंतरराष्ट्रीय योग दिन; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन
  2. International Yoga Day 2023 : आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व...
  3. International Yoga Day 2023 : 'ही' पाच आसने रोज करा अन् निरोगी राहा!
Last Updated :Jun 21, 2023, 8:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.