ETV Bharat / state

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’पर्यंत झेप; पहा थक्क करणारा प्रवास

author img

By

Published : Nov 7, 2019, 4:03 PM IST

जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याची गाठ मनाशी बांधून, केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर येथील राहुल घोडके या मुलाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्रो) झेप घेतली आहे. चेंबूर येथील मारवली चर्च परिसरातील नालंदानगर झोपडपट्टीत राहुलचे दहा बाय दहाचे घर आहे. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. आईने परिसरातील घरची धुणी-भांडी आणि स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह केला.

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’ पर्यंत झेप

मुंबई - जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर जाण्याची गाठ मनाशी बांधून, केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर येथील एका मुलाने अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत (इस्रो) झेप घेतली आहे. राहुल घोडके असे या मुलाचे नाव आहे. सध्या इस्रोत तो तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.

दारिद्र्याशी लढा देत चेंबुरच्या राहुलची ‘इस्रो’ पर्यंत झेप

चेंबूर येथील मारवली चर्च परिसरातील नालंदा नगर झोपडपट्टीत राहुलचे दहा बाय दहाचे घर आहे. जवाहर विद्यालयात त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली. आईने परिसरातील घरची धुणी-भांडी आणि स्वयंपाकाचे काम करून उदरनिर्वाह केला. आईची होणारी फरपट पाहून राहुलने आपले शिक्षण थांबवून मोठी बहिण दर्शनाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. स्वतः ही कामाला जाऊ लागला.

हेही वाचा - आदिवासी पाड्यावार 'एक करंजी लाखमोलाची' या उपक्रमाचे आयोजन; वंचितांना कपडे व फराळाचे वाटप

मात्र, शिक्षणाची ओढ त्याला शांत बसू देत नव्हती. दोन वर्षांनंतर त्याने आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. खूप मेहनत घेऊन त्याने अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर व्हजेटीआय महाविद्यालयात शिकत असतानाच त्याला नोकरी मिळाली. दरम्यान, इस्रोत भरती होण्याची इच्छा मनाशी ठेवून तो परीक्षेच्या तयारीला लागला. भारतातील 15000 पेक्षा जास्त मुलांनी ही परिक्षा दिली. परीक्षेत राहुल हा मागासवर्गीय गटातून 3ऱ्या श्रेणीने तर खुल्या गटातून 16व्या श्रेणीने उत्तीर्ण झाला. त्यानंतर राहुलची इस्रोच्या अहमदाबादमधील केंद्रात तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.

Intro:चेंबुरच्या तरुणाची दारिद्र्याशी लढा देत ‘इस्रो’ पर्यंत थक्क करणारी झेप

घरात अठराविश्वे दारिद्र्य जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना आयुष्यात काही तरी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर कसे जाता येईल ही गाठ मनाशी बांधून केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर मधील एका मुलाने अहमदाबादमधील 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'च्या (इस्रो) केंद्रापर्यंत झेप घेतली आहे . तिथे तो सध्या तंत्रज्ञ म्हणून काम करत आहेBody:चेंबुरच्या तरुणाची दारिद्र्याशी लढा देत ‘इस्रो’ पर्यंत थक्क करणारी झेप

घरात अठरा विश्व दारिद्र्य जन्मापासून गरिबीचे चटके सोसत असताना आयुष्यात काही तरी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर कसे जाता येईल ही गाठ मनाशी बांधून केवळ मेहनतीच्या जोरावर चेंबूर मधील एका मुलाने अहमदाबादमधील 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'च्या (इस्रो) केंद्रापर्यंत झेप घेतली आहे . तिथे तो सध्या तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.


चेंबूर येथील मारवली चर्च परिसरातील नालंदा नगरात झोपडपट्टीत दहा बाय दहा च्या घरात राहणारा राहुल घोडके याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चेंबूर मधील जवाहर विद्यालयात पूर्ण केले. दहावी परीक्षा पास झाला. त्याच वर्षी मजुरीचे काम करणारे वडील यांचे छत्र हरपले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईवर आली.
त्याच वर्षी आईने परिसरातील इमारतीत घरची धुणी-भांडी व कॅटरर्सचे काम सुरू करून आपल्या मुलांचा उदरनिर्वाह भागवित होती.
मोठी मुलगी दर्शना ही सुद्धा शिक्षण घेत होती.
आई आमच्या शिक्षणासाठी दिवसरात्र झटत असल्याने तिची होणारी फरपट पाहून राहुलने आपले शिक्षण थांबवून बहिणीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले.
स्वतः ही कामाला जाऊ लागला. आईला व बहिणीच्या शिक्षणा करिता मदत करीत होता परन्तु दोन वर्षापासून तो पुस्तके-अभ्यासाशिवाय वावरत होता, पण त्याच्या मनाने शिक्षणाची ओढ सोडली नव्हती. या हालाखीच्या परिस्थितीवर मात करावयाची असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पियाल्यास कोणीतीही व्यक्ती गुरगुरल्या शिवाय रहाणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार लक्षात ठेवून अखेर शिक्षण घेण्याचे ठरविले त्याने कुर्ला पश्चिम आयटीआय इमारतीमध्ये स्थलातरीत झालेले गोवंडी आयटीआय कार्यालयात जाऊन दहावीमध्ये मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या जोरावर 2012 रोजी इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
खूप मेहनत घेऊन त्याने या या ट्रेंड मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांतर त्याने माटुंगा येथील व्हीजेटीआय मध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमाला 2016 ते 18 रोजी दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. त्यात ही प्रथम श्रेणी प्राप्त केली. व्हजेटीआय महाविद्यालयात शिकत असताना त्याला
वर्टिव्ह एनर्जी प्रा.ली. कंपनीत प्लेसमेंट मिळाली.
या कंपनीत सर्व्हीस इंजिनिअर पदावर काम करीत असताना
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'च्या (इस्रो) भरती होण्याची इच्छा मनाशी ठेवून परीक्षेच्या तयारीला लागला.
काही दिवसातच त्यात भरती असल्याची माहिती मिळताच त्याने अर्ज दाखल केला.
या परीक्षाला भारतातील विविध राज्यातील एकूण 15000 हजार पेक्षा अधिक मुलांनी अर्ज दाखल करून
परीक्षा दिली होती.
या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा राहुल हा मागासवर्गीय गटातून 3 रा रँक तर खुला गटातून 16 रँक ने उत्तीर्ण झाला. सद्या राहुलची अहमदाबादमधील 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'च्या (इस्रो) केंद्रात तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती झाली आहे.
Byt : श्रद्धा रमेश घोडके आई (राहुल)
Byt : दर्शना त्रिमुखे- बहीण (राहुल)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.