ETV Bharat / state

Inquiry Committee : शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलन प्रकरणी विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती

author img

By

Published : Apr 10, 2022, 12:58 PM IST

Vishwas Nagre Patil
विश्वास नागरे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी (Silver Oak Residence) एसटी कामगारांनी ( ST workers) शुक्रवारी केलेल्या आंदोलनानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे-पाटील (DCP Vishwas Nangre-Patil) यांच्या अध्यक्षतेखाली समिती (Inquiry committee) स्थापन करण्यात आली असून समिती या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल गृहमंत्र्यांना सादर करणार आहे.

मुंबई: शरद पवार यांच्या घरा समोर झालेले आंदोलन पूर्वनियोजित होते पत्रकारांना यासंदर्भात पहिले माहिती मिळाली होती मात्र गुप्तचर यंत्रणेला माहिती मिळू शकली नव्हती सुरक्षिततेच्या त्रुटीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, (Home Minister Dilip Walse-Patil) पोलीस आयुक्त संजय पांडे, (CP Sanjay Pandey) मुंबई पोलीस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे-पाटील यांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा केल्यानंतर समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

विश्वास नागरे पाटील यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल गृहमंत्र्यांना देणार आहे. पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खा. सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. सिल्व्हर ओक तसेच बारामतीमधील गोविंदबाग येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : MNS Loudspeaker : शिवसेना भवनासमोर भोंगा लावणारा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.