ETV Bharat / state

indian rupee plunges : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 81 पैशाने घसरला

author img

By

Published : Mar 7, 2022, 3:56 PM IST

सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत (Against the US dollar) रुपया 81 पैशांनी घसरून 76.98 वर आला आहे. रशिया-युक्रेन संघर्षाचे (Russia-Ukraine conflict) परिणाम सर्वच क्षेत्रात पहायला मिळत आहेत. कच्चा तेलाच्या किंमती (Crude oil prices) पण वाढल्या आहेत. देशांकर्गत चलनवाढ आणि व्यापारातील तूटी बद्दल चिंता वाढली आहे.

indian rupee plunges
डॉलरच्या तुलनेत रुपया

मुंबई: रशिया-युक्रेन संघर्षाचे परिणाम सगळ्यांच क्षेत्रात तीव्रतेने जाणवत आहेत. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81 पैशांनी घसरून 76.98 वर आला. विदेशी मुद्रा व्यापार्‍यांनी सांगितले की रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत आणि देशांतर्गत चलनवाढ आणि व्यापक व्यापार विषयक तूट याबद्दल चिंता वाढली आहे.

याशिवाय, विदेशी निधीचा सततचा प्रवाह आणि देशांतर्गत इक्विटीमधील कमी कल यामुळेही गुंतवणूकदारांच्या भावनेवर परिणाम झाला आहे. आंतरबँक परकीय चलनात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 76.85 वर उघडला, नंतर शेवटच्या बंदच्या तुलनेत 81 पैशांची घसरण नोंदवून 76.98 वर घसरला. शुक्रवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 23 पैशांनी घसरून 76.17 वर बंद झाला होता, जो 15 डिसेंबर 2021 नंतरची सर्वात कमी पातळीवर आहे.

दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत ग्रीनबॅकची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 0.29 टक्क्यांनी वाढुन 98.93 पर्यंत गेला. दरम्यान, जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 9.38 टक्क्यांनी वाढून 129.19 डाॅलर प्रति बॅरलवर पोहोचले. रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले की, आज सकाळी कच्च्या तेलासह डॉलरमध्ये वाढ झाल्याने भारतीय रुपयाची कमजोरी सुरू झाली. ही अस्थिरता रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) पाऊले उचलु शकते, असेही अय्यर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी आशियाई बाजारात अमेरिकन डॉलर आणि येन मजबूत होत आहेत कारण गुंतवणूकदार सुरक्षित बाजाराकडे वळले आहेत.

हेही वाचा : Crude oil prices : कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या दर पोचला प्रति बॅरल 130 डॉलरच्या उच्चांकावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.