ETV Bharat / state

India Vs NZ Semifinal : वानखेडे मैदान परिसर पूर्ण क्रिकेटमय, भारताच्या विजयाचा क्रिकेटप्रेमींना आत्मविश्वास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 6:22 PM IST

India Vs NZ Semifinal : क्रिकेट विश्वचषकातील सेमी फायनलचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. (Cricket fans confident of India victory) यामध्ये भारतच विजयी ठरेल, असा दांडगा आत्मविश्वास क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केलाय. वानखेडे स्टेडिअमबाहेर आणि आतमध्येसुद्धा क्रिकेट प्रेमींची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. 2019 मध्ये न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्याची ही भारतीय क्रिकेट संघाकडे चालून आलेली संधी आहे, अशी भावना क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली. (Wankhede Stadium)

India Vs NZ Semifinal
क्रिकेटप्रेमी

भारताच्या विजयाबाबत क्रिकेटप्रेमींची प्रतिक्रिया

मुंबई India Vs NZ Semifinal : क्रिकेट विश्वचषकातील सेमी फायनलचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याकडे सर्वच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बुधवारचा सामना बघण्यासाठी देशातील तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेट प्रेमी कालच मुंबईत दाखल झाले होते. 2019 मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघानं भारताला हरवलं होतं. त्याचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चालून आली आहे. या सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी अनेक क्रिकेट प्रेमी वानखेडे स्टेडियममध्ये आणि बाहेर गर्दी केलेली दिसत आहे.


भारताचा परफॉर्मन्स पुढेही कायम असेल : एक क्रिकेट प्रेमी म्हणाला की, प्रत्यक्षात क्रिकेट सामना बघण्याचा हा माझा पहिला अनुभव असणार आहे. सामना बघण्यासाठी पुण्यावरून येथे आलेलो आहे. सामना बघण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे; कारण की 2019 सालच्या विश्वचषकात न्यूझीलंडने आपल्याला हरवलं होतं. आजच्या मॅचमध्ये विराट कोहली चांगल्या पद्धतीनं फलदाजी करेल. गोलंदाजीमध्ये बुमरा, सामी गोलंदाजी करेल असा विश्वास मला आहे. भारतीय टीमचा परफॉर्मन्स आजच्या मॅचमध्ये कायम राहील. फायनल मॅचमध्ये देखील भारतीय टीमचा परफॉर्मन्स असाच राहील, असा विश्वास या पुण्याहून आलेल्या वैभव सुर्वेला वाटत आहे.

काय म्हणाली महिला क्रिकेट प्रेमी - नागपूर शहरातून आलेल्या संध्या नंदे म्हणाल्या की, आयुष्यात पहिल्यांदा फर्स्टक्लास 'लाईव्ह क्रिकेट' पाहण्याचा आनंद मला वानखेडे मैदानात अनुभवता येणार आहे. विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे. आजच्या मॅचमध्ये भारतीय फलंदाजीमध्ये विराट कोहली आपली चुणूक दाखवेल आणि गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला रोखतील. आपण मॅच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


वातावरण पूर्ण क्रिकेटमय : मुंबईमध्ये एका बाजूला वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू आहे. तर मैदानाच्या बाहेर क्रिकेटच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. क्रिकेटचा जोश त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तर याच गर्दीमध्ये भारतीय क्रिकेट टीमचं नाव असलेले टी शर्ट, टोपी, गमछा आणि भारतीय ध्वज विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची लगबग पाहायला मिळत आहे. मुंबई शहर त्यातले त्यात वानखेडे परिसर पूर्णपणे क्रिकेटमय झालं आहे.


हेही वाचा:

  1. Cricket World Cup 2023 : गिल पाठोपाठ कोहलीचंही अर्धशतक; वाचा स्कोर
  2. IND vs NZ Semifinal : धमकीनंतर वानखेडे स्टेडियम समोर पोलीस सुरक्षा यंत्रणा वाढवली; प्रेक्षकांना तपासणी करून मैदानात प्रवेश, पाहा व्हिडिओ
  3. IND vs NZ Semifinal : रजनीकांत ते बिग बी; भारत-न्युझीलंड उपांत्य सामन्याला 'हे' दिग्गज सेलिब्रिटी सामन्याला लावणार हजेरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.