ETV Bharat / state

लोअर परेल ते वरळी टॅक्सी सेवा बंद; वरळीकरांचे हाल

author img

By

Published : Oct 3, 2019, 11:44 AM IST

लोअर परेल स्थानक ते वरळी नाका अशी शेअर टॅक्सी सेवा चालवली जाते. दिवसभरात या ठिकाणी सकाळी व रात्री ४० ते ४५ टॅक्सी चालतात. यामधून १० हजारांहून अधिक लोक प्रवास करतात. मात्र, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याने वरळी नाका ते लोअर परेल, अशी चालणारी शेअर टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

लोअर परेल ते वरळी टॅक्सी सेवा बंद

मुंबई - शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी लोअर परेल ते वरळी नाका शेअर टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, वरळी आणि लोअर परेलकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहे. यामुळे हजारो नागरिकांना पायपीट करावी लागल्याने संतापाची लाट पसरली आहे.

लोअर परेल ते वरळी टॅक्सी सेवा बंद

लोअर परेल स्थानक ते वरळी नाका अशी शेअर टॅक्सी सेवा चालवली जाते. दिवसभरात या ठिकाणी सकाळी व रात्री ४० ते ४५ टॅक्सी चालतात. यामधून १० हजारांहून अधिक लोक प्रवास करतात. मात्र, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याने वरळी नाका ते लोअर परेल, अशी चालणारी शेअर टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना व वरळीकरांना बस आणि इतर टॅक्सीने प्रवास करावे लागत आहे.

हेही वाचा- 'मी शेतकरी' अभियानास सुरुवात, राज्यभरातील गावांमध्ये करणार ठिय्या

शेअर टॅक्सी नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी इतर टॅक्सीचालक येत नसल्याने प्रवासी आणि टॅक्सीचालक यांच्यामध्ये वाद होत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यातील एक मोठे नेते या विभागातून फॉर्म भरणार असल्याने रस्त्यावर रहदारी आणि गर्दी होणार आहे. त्यासाठी आम्ही टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासारखा नेता या मतदारसंघातून आमदार झाला तर या विभागातील युवकांना रोजगार मिळेल, असे वरळी नाका लोअर परेल शेअर टॅक्सी चालक मालक संघटनेचे राजेश कदम यांनी सांगितले.

Intro:मुंबई - शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज वरळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी लोअर परेल ते वरळी नाका शेअर टॅक्सी सेवा बंद ठेवल्याने वरळी आणि लोअर परेलकडे ये जा करणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. यामुळे हजारो नागरिकांना पायपीट करावी लागल्याने संतापाची लाट पसरली आहे.
Body:लोअर परेल स्थानक ते वरळी नाका अशी शेअर टॅक्सी सेवा चालवली जाते. दिवसभरात या ठिकाणी सकाळी व रात्री 40 ते 45 टॅक्सी चालतात. यामधून दहा हजाराहून अधिक लोक प्रवास करतात. मात्र आज शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याने वरळी नाका ते लोअर परेल अशी चालणारी शेअर टॅक्सी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना व वरळीकरांना बस आणि इतर टॅक्सीने प्रवास करावा लागत होता. शेअर टॅक्सी नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागली आहे. काही ठिकाणी इतर टॅक्सीचालक येत नसल्याने प्रवासी आणि टॅक्सीचालक यांच्यामध्ये वाद होत आहेत.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राज्यातील एक मोठे नेते या विभागातून फॉर्म भरणार असल्याने रस्त्यावर ट्रॅफिक आणि गर्दी होणार आहे. त्यासाठी आम्ही टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासारखे नेते या मतदार संघातून आमदार झाले तर या विभागातील युवकांना रोजगार मिळेल असे वरळी नाका लोअर परेल शेअर टॅक्सी चालक मालक संघटनेचे राजेश कदम यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.