ETV Bharat / state

Mumbai Rain Update: मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

author img

By

Published : Mar 21, 2023, 8:50 AM IST

Updated : Mar 21, 2023, 9:41 AM IST

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. 17 मार्चला अवकाळी पावसाने मुंबईत देखील हजेरी लावली. आता हवामान विभागाने पुढील तीन ते चार तास पावसाची शक्यता वर्तविली आहे.

Mumbai Rain Update
मुंबईत पाऊस

मुंबईत पाऊस

मुंबई : आज सकाळी साडे सहानंतर मुंबईत अनेक ठिकाणी सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 3-4 तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. घराबाहेर पडताना याची नोंद घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने प्रदूषणापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात पिकांचे नुकसान : राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस गारपिटीसह पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मुंबईसह महाराष्ट्रमध्ये पाऊस पडेल, अशी शक्यता गेले काही दिवस हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

प्रदूषण झाले कमी : सकाळी मुंबईकर कामावर जाण्यासाठी निघाले असताना तसेच विद्यार्थी शाळेमध्ये निघाले असतानाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कपाटात अडगळीत टाकलेल्या छत्री आणि रेनकोट काढावे लागले. मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामाची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर असलेल्या मातीमुळे चिखल झाला होता. या चिखलामधून नागरिकांना ये जा करावी लागत आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण असते. त्यातच बांधकाम सुरू असल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र दोन दिवस हलका पाऊस पडल्याने प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे.

मुंबईकरांना दिलासा : मुंबई आणि मुंबई बाजूच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण होऊन गेला आहे. 17 मार्चला मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अलर्ट जारी करण्यात आला होता.

हेही वाचा : Mumbai Weather Update: मुंबईत अवकाळी पावसाने लावली हजेरी; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated : Mar 21, 2023, 9:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.