ETV Bharat / state

मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘रिचार्ज झोन’; योगा डॉग थेरपीसह आर्ट थेरपीचा समावेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 12:59 PM IST

Updated : Dec 4, 2023, 1:27 PM IST

special recharge zone started for IIT students
मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी खास ‘रिचार्ज झोन’ सुरू

IIT Mumbai : नोकरीसाठीची मुलाखत म्हटलं की सर्वांनाच टेंशन येतं. दरम्यान, विद्यार्थ्यांमधील हीच अस्वस्थता ओळखून पवईच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’नं (आयआयटी) समुपदेशनासह विद्यार्थ्यांकरता एक अनोख ‘रिचार्ज झोन’ कार्यरत केलं आहे.

मुंबई IIT Mumbai : आयआयटीनं तयार केलेल्या या केंद्रात विद्यार्थ्यांमधील ताणतणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या थेरपींचा वापर होतो. यामध्ये योगा डॉग थेरपी, फूट मसाज, पेट थेरपी, आर्ट थेरपीसारख्या उपचारपद्धतींचा समावेश आहे. जसजसे प्लेसमेंटचे दिवस जवळ येतात तसतसे आयआयटीतील विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावपूर्वक वातावरण बघायला मिळतं. त्यामुळं या विद्यार्थ्यांना गरज भासल्यास समुपदेशनाची सुविधा स्टुडंट्स वेलनेस सेंटरतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात आहे.

आयआयटी प्लेसमेंट सीझनचे विद्यार्थी अनेकदा गोंधळलेले असतात. अनेकांमध्ये पराकोटीची अस्वस्थता असते. या काळात एक सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगून केवळ त्यांचं समुपदेशनच नव्हे तर माईंडफुलनेस कृतीतून त्यांच्या ताणतणावांना मोकळी वाट करून देण्याचा हा प्रयत्न आहे. - शौकत अली, समुपदेशक

डॉग थेरपीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद : यासंदर्भात अधिक माहिती देत केंद्राचे हंगामी प्रमुख आणि समुपदेशक शौकत अली म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून आपला मानसिक तणाव कमी करायचाय, त्यांच्यासाठी या ठिकाणी रंग, ब्रश, कॅनव्हास यांची सोय करण्यात आलीय. तसंच येथे डॉग थेरपीही उपलब्ध करून देण्यात आलीय. यासाठी केंद्रात दोन कुत्री असून विद्यार्थी त्यांच्याशी येऊन कितीही वेळ खेळू शकतात. तसंच विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळतोय, असंही त्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांना एकूणच अभ्यासामध्ये आणि प्लेसमेंट मिळवण्यामध्ये उपयोग होण्यासाठी स्टुडंट्स वेलनेस सेंटर सुरू करण्यात आलंय. यामध्ये वेगवेगळ्या थेरपींचा उपयोग केला जात असून योगाचा देखील यामध्ये उपयोग होतो. - फाल्गुनी, प्रवक्त्या , आयआयटी

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया : या संदर्भात विचारण्यात आलं असता एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, अगोदर मुलाखतीला जाण्यापूर्वी त्याच्या हाता-पायाला मुंग्या यायच्या. परंतु स्टुडंट्स वेलनेस सेंटरमध्ये डॉग थेरपी केल्यानंतर त्याला तणावमुक्त होण्याय मदत मिळाली. तसंच यानंतर त्याच्या मनातून मुलाखतीची भीतीही गेली.

विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न : आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळतं. तसंच याच निराशेतून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्यांचं प्रमाणही अधिक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना असलेलं नैराश्य आणि ताणतणाव काही प्रमाणात दूर करण्यासाठी आयआयटीकडून प्रयत्न केले जात आहेत.


हेही वाचा -

  1. controversy in IIT Mumbai : आयआयटी मुंबईत शाकाहारवाले म्हणतात येथे मांसाहारांना जागा नाही
  2. IIT Bombay Student Suicide SIT Probe: आयआयटीच्या दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन
  3. IIT Research Development : आयआयटी मुंबई रिसर्च क्षेत्रात अधिक वेतन; तर आयटी क्षेत्रात वेतनात घट
Last Updated :Dec 4, 2023, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.