ETV Bharat / state

Border Dispute : वेळ पडल्यास कर्नाटकला चोख प्रत्युत्तर; आशिष शेलार यांचे कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर वक्तव्य

author img

By

Published : Dec 3, 2022, 11:00 PM IST

अरे ला कारे करण आमची संस्कृती नाही, पण वेळ आली, तर योग्य उत्तर देऊ अशा शब्दात कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावर ( Karnataka Maharashtra border dispute ) आमदार आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यांनी भाष्य केले आहे.

Border Dispute
Ashish Shelar

मुंबई - महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादावरून ( Karnataka Maharashtra border dispute ) दररोज नवीन नवीन वाद समोर येत आहेत. या मुद्द्यावर बोलताना भाजप नेते, आमदार आशिष शेलार ( MLA Ashish Shelar ) यांनी सांगितले की, जर कर्नाटकमधून तणाव निर्माण झाला, तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. तसेच महाराष्ट्रातील मंत्रीच काय तर या देशात कोणीही कुठेही जाऊ शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) यांनी जरी आमच्या मंत्र्यांना विरोध केला तरी, ते मंत्री तिथे जाणारच असेही स्पष्ट केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अरे करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला कारे होईल - महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून तणावाचे वातावरण दोन्ही बाजूने होऊ नये, तसेच कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. या विषयात महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आमचा अधिकार त्या गावांवर आहे. कुठल्याही पक्षाचे सरकार राज्यात असलं तरी सुद्धा कोणीही भूमिकेमध्ये बदल केलेला नाही, असेही आशिष शेलार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असून आमचं सरकार आल्यानंतर त्या भागामध्ये काही योजना पुरवण्याचं आम्ही ठरवलं आहे. जतमध्ये पाण्याच्या योजना पुरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. तरीसुद्धा कर्नाटकमधून जर कोणी अरे करण्याचा प्रयत्न केला, त्याला कारे उत्तर दिले जाईल, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

देशात कोणाला कुठेही जाण्याची परवानगी - महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा धमकी वजा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला आहे. त्याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, या देशात कोणाला कुठेही जाण्याची परवानगी आहे. कुणीही कोणाला थांबवू शकत नाही, म्हणून बोम्मई यांनी अशा पद्धतीचा इशारा देऊ नये. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण आहे? या प्रश्नावर आशिष शेलार यांना विचारले असता. उद्धव ठाकरे यांच्या मनातील मुख्यमंत्री ओळखण्यासाठी मी काही मनकवडा नाही आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्यासाठी, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हेच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जुने व्हिडिओ काढाल तर तुमचीच गोची - अजय आशर यांची 'मित्र' च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आशिष शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रवक्ते व प्रदेश अध्यक्ष डोक्यावर पडले आहेत का? डोक्यावर पडल्यामुळे त्यांची बुद्धी सरकल्यासारखी ते वागत आहेत. माझा हा प्रश्न काँग्रेसला होता. नाना पटोले जेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांना मी हा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर मी आजही ठाम आहे. तत्कालीन सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजय आशरला क्लीनचीट कशी दिली गेली, याच त्यांनी उत्तर द्यावं. तसेच जुने व्हिडिओ काढून विनाकारण राजकारण करू नये. नाहीतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुठल्या भागाला लखवा लागला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं. तर दुसरीकडे शिवसेना ही वाघ नाही, तर मांजर आहे.असं काँग्रेसने म्हटलं होतं व ते व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत. जुने व्हिडिओ काढून जर प्रश्न विचारायचे असतील तर त्यामध्ये तुमचीच गोची होईल, असा इशाराही अशी शेलार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.