ETV Bharat / state

मुलुंडमधील सात मजली इमारतीला भीषण आग, 80 जणांची सुखरुप सुटका

author img

By

Published : Mar 16, 2023, 11:03 AM IST

Updated : Mar 16, 2023, 11:42 AM IST

मुंबईमधील उंच इमारतींना लागण्यात येणाऱ्या भीषण आगीची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलुंडमधील सात मजली इमारतीला आग लागल्याने अनेकांचे प्राण धोक्यात आले होते. अग्नीशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत.

मुलूंड
Mulund building fire

मुंबई : मुलुंड येथे सात मजली निवासी इमारतीला भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. अग्नीशमन विभागाने प्रयत्नांची शर्थ करत सुमारे 80 जणांना वाचविले आहे. तर तीन मुलांसह दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना मुलुंड पश्चिम येथील जागृती सोसायटीत १५ मार्च रोजी दुपारी २.५५ च्या सुमारास घडल्याची माहिती आहे.

इमारतीचा संपूर्ण जिना धुराने भरला मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने (MFB) एकूण 80 जणांना जिनेवरून टेरेसवर वाचवले. तर काहींना तळमजल्यावर खाली सुखरुप आणण्यात आले. त्यापैकी 10 जण पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले, ही माहिती अग्रवाल रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.आग ही निवासी इमारतीतील एका सामान्य विद्युत मीटरच्या केबिनमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक मेन केबल्स, सर्व मीटर्स, सर्व स्विचेस इत्यादींपर्यंत मर्यादित होती. मुंबई अग्निशमन दलाने ही आग आटोकाट प्रयत्न करून विझवली. आगीमुळे, इमारतीचा संपूर्ण जिना धुराने भरला होता. काही रहिवासी लॉबीमध्ये अडकले होते.

फर्निचरला आग लागल्यानंतर १००हून अधिक दुकाने खाक नुकतेच जोगेश्वरी भागातील एका फर्निचरच्या गोदामाला सोमवारी भीषण आग लागली होती. आग पाहायला लोकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली होती. फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत १००हून अधिक दुकाने जळून खाक झाली व मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीमागे सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कारण सांगितले जात आहे. या भागात ६०० हून अधिक दुकाने आहेत. ही आग लेव्हल ३ म्हणून घोषित करण्यात आल्यांतर अग्नीशमन दलाने आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

सोमवारी आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू- मुंबईत आगीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असताना उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच आगीच्या घटना आता वाढत असल्याचा अंदाज आहे. आग लागण्यामागील हे देखीलएक कारण असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दिवसभरात मुंबईत दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्याने एकच धांदल उडाली होती. यात एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Last Updated : Mar 16, 2023, 11:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.