ETV Bharat / state

Mumbai Electricity Issue : वीज पुरवठा खंडित प्रकरणाची उच्चस्तरीच चौकशी; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

author img

By

Published : Feb 27, 2022, 7:46 PM IST

मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी ( Mumbai Electricity Issue ) राज्य शासनाकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Minister Dr. Nitin Raut ) यांनी या संदर्भातील आदेश देत, दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Energy Minister Dr. Nitin Raut
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई - मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी ( Mumbai Electricity Issue ) राज्य शासनाकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Minister Dr. Nitin Raut ) यांनी या संदर्भातील आदेश देत, दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, बीएआरएसच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील काही भागात रविवारी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला होता. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांकडून ऊर्जामंत्री राऊत यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत व्हावा, यासाठी सूचना दिल्या. दुरुस्ती कामांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. विविध कारणांमुळे झालेला बिघाड अवघ्या ७० मिनिटात दुरुस्त करुन वीज पुरवठा पूर्ववत केल्याचेमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले. तसेच हा प्रकार गंभीर आहे असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात दोषी आढळून येणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश दिल्याचे ही मंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.

येथे वीज खंडीत -

दक्षिण मुंबईसाठी ट्रॉम्बे या मुख्य ग्रहण केंद्रामधून २२० केव्ही कळवा - ट्रॉम्बे, मुलुंड - ट्रॉम्बे, सोनखर - ट्रॉम्बे, चेंबूर - ट्रॉम्बे, साल्सेट - ट्रॉम्बे १, साल्सेट - ट्रॉम्बे २, चेंबूर - ट्रॉम्बे १ आणि चेंबूर - ट्रॉम्बे २ या वाहिन्यांद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. एमएमआरडीए मेट्रो २ बी च्या कामा करता २२० kV सोनखर - ट्रॉम्बे आणि चेंबूर - ट्रॉम्बे वाहिनी ४ फेब्रुवारी आणि ५ फेब्रुवारीपासून बंद केल्या होत्या. २२० केव्ही साल्सेट - ट्रॉम्बे १ ही वाहिनी देखील मेट्रो ४ प्रकल्पाकरिता २६ फेब्रुवारीपासून बंद ठेवली आहे. मात्र, भार नियंत्रणाकरिता नेरुळ - चेंबूर आणि सोनखर - ट्रॉम्बे वाहिन्या एकत्र जोडल्या होत्या. त्या वेगळ्या करण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ७ वाजता बंद केल्या. सकाळी ८ वाजून ४४ मिनिटांनी मुलुंड - ट्रॉम्बे हीवाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली.

हेही वाचा - मुंबईसह ठाणे - कळवा भागातील वीज पुरवठा अचानक खंडीत, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

आगीमुळे वीज पुरवठा खंडीत -

राज्य भारप्रेषण केंद्राने भार नियंत्रणाकरिता टाटा थर्मल आणि टाटा हायड्रो निर्मिती केंद्रांना ०९ वाजून ३० मिनिटांनी निर्मिती क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डीएसएमच्या व्हीएसईच्या माध्यमातून निर्मिती करण्यासाठी टाटा कडून मेलची मागणी केली. दरम्यान २२० केव्ही कळवा - ट्रॉम्बे वाहिनी ९ वाजून ४९ मिनिटांनी बीएआरसी च्या कॅम्पसमधील जंगलात लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ट्रॉम्बे - सालसेट वाहिनीवर ओव्हरलोड होऊन बंद पडली. त्याचा परिणाम दक्षिण मुंबईतील कुलाबा, महालक्ष्मी, दादर आदी परिसरामध्ये झाल्याचे उर्जा मंत्री राऊत यांनी सांगितले.

वीज पुरवठा पूर्ववत -

ट्रॉम्बे - साल्सेट २२० केव्ही. वाहिनी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी पूर्ववत केली. दक्षिण मुंबई मधील विद्युत पुरवठा कर्नाक, बॅकबे, परेल आणि महालक्ष्मी मधून १० वाजून १३ मिनिटांपासून १० वाजून ३० मिनिटपर्यंत पूर्ववत केली. तर संपूर्ण विद्युत पुरवठा ११ वाजून १० मिनिटांनी पूर्ववत केला. ट्रॉम्बे येथील विद्युत संच ७ हा १० वाजून ५६ मिनिटांनी पूर्ववत करण्यात आला. तर ५०० मेगा वाट विद्युत संच ५ हा १ वाजून ४ मिनिटांनी आणि २५० मेगा वाट संच ८ हा ५ साडेतीन वाजता पूर्ण केला. तसेच महापारेषणच्या नेरुळ - चेंबूर, कळवा - ट्रॉम्बे, सोनखर - ट्रॉम्बे या वाहिन्या साडे दहा वाजल्यापासून पाऊणेबारा पर्यंत पूर्ववत केला. तसेच मुलुंड - ट्रॉम्बे या वाहिनीच्या तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम बीएआरएस परिसरात सुरु असल्याची महावितरण विभागाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.