Chhath Puja : छठ पूजेवरून उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले; मैदान देण्याचे आदेश

author img

By

Published : Oct 27, 2022, 5:17 PM IST

Chat Puja

घाटकोपर येथे आचार्य अत्रे मैदानामध्ये छटपूजा ( Chhath Puja in Acharya Atre Maidan ) करण्याकरिता मागण्यात आलेल्या परवानगी मुंबई महानगरपालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) देण्यास टाळाटाळ केल्या बद्दल उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले ( High Court reprimands Municipal Corporation ) आहे.

मुंबई - घाटकोपर येथे आचार्य अत्रे मैदानामध्ये छटपूजा ( Chhath Puja in Acharya Atre Maidan ) करण्याकरिता मागण्यात आलेल्या परवानगी मुंबई महानगरपालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) देण्यास टाळाटाळ केल्या बद्दल उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले ( High Court reprimands Municipal Corporation ) आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका राखी जाधव ( Former NCP corporator Rakhi Jadhav ) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. तसेच राखी जाधव यांच्या संस्थेला छटपूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

छटपूजेसाठी उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले

महापालिकेच्या कारभारावर ताशेरे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका राखी जाधव यांनी मुंबई महानगरपालिकेला पूजा करिता परवानगी मागितली होती. मात्र, महापालिकेकडून परवानगी देण्यात आली नव्हती. महापालिकेने भाजपच्या संस्थेला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पहिला अर्ज करून सुद्धा परवानगी नाकारण्यात आल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत महापालिकेचा आदेश रद्द करत राखी जाधव यांना मैदान देण्यात यावे असे, आदेश महापालिकेला देण्यात आहे.


महापालिकेवर ओढवली नामुष्की - शिवसेनेचा दसरा मेळाव्या करिता शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क येथील मैदानावर मेळाव्या करिता अर्ज करण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाकडून सर्वात पहिले अर्ज करून सुद्धा महापालिकेकडून परवानगी देण्यात येत नसल्याने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यावेळी देखील महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारले. नंतर ठाकरे गटाला मैदान देण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजं असतानाच अंधेरी पोट निवडणुकी करिता ऋतुजा लटके या ठाकरे गटाकडून उमेदवार अर्ज भरणार असल्याने त्यांनी त्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, महापालिकेकडून राजीनामा स्वीकारण्यात येत नसल्याने तुझ्या लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी देखील न्यायालयाने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच राजीनामा मंजूर करण्याचे पत्र देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.अखेर राष्ट्रवादीच्या ताब्यात मौदान - नोंदणीकृत सोसायटीला बृहन्मुंबई महानगरपालिकेने पत्र पाठवत मैदानावर छट पूजा आयोजित करण्यास परवानगी नाकारली होती. पालिकेच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेत याचिकाकर्त्यांना सुटटीकालीन न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले नंतर राखी जाधव यांनी सुट्टी कालीन खंडपीठांसमोर दात मागितले होते. येत्या 30, 31 ऑक्टोबर रोजी छट पूजेचे आयोजन करण्यासाठी मुंबईतील मैदानावर मंडप छठपूजेसाठी कृत्रिम तलाव बांधण्यासाठी दुर्गा परमेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते यांनी पालिकेकडे परवानगी मागितली होती. मात्र, 19 ऑक्टोबर रोजी पालिकेकडून पत्र प्राप्त झाले. ज्यात याचिकाकर्त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचे म्हटले होते. त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पालिकेने अन्य मंडळांना कथितपणे कोणत्याही अर्जाशिवाय केवळ भारतीय जनता पक्षाने पाठवलेल्या पत्राच्या आधारे छट पूजा आयोजित करण्याची परवानगी दिल्याचे याचिकेत नमूद कऱण्यात आले आहे. वाहतूक, अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र असूनही मुंबई पोलिसांनी एनओसी देण्यास नकार दिल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.