ETV Bharat / state

Gaza ISrael Conflict : हमास हल्ल्यात अडकली 'अकेली'; नुसरत भरूचानं अनुभवला जीवघेणा थरार अन् मग . . .

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 9:11 AM IST

Updated : Oct 8, 2023, 4:08 PM IST

Gaza ISrael Conflict : चित्रपट महोत्सवाला गेलेली अभिनेत्री नुसरत भरूचासोबत शनिवार दुपारपासून संपर्क होत नसल्यानं खळबळ उडाली होती. हमास हल्ल्यातील जीवघेण्या थरारात नुसरत भरूचा इस्राईलमध्ये अडकली. दरम्यान नुसरत भरूचा या थरारक घटनेतून सुरक्षितस्थळावर पोहोचली आहे.

Gaza ISrael Conflict
अभिनेत्री नुसरत भरूचा

मुंबई Gaza ISrael Conflict : सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा चित्रपट महेत्सवासाठी इस्राईलमध्ये गेली होती. मात्र त्यानंतर शनिवार दुपारपासून अभिनेत्री नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसल्यानं नुसरते कुटूंब आणि चित्रपट निर्मिती संस्थेतील अधिकारी तिच्याशी संपर्क करत होते. मात्र अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याशी संपर्क होत नसल्याचं मोठी खळबळ उडाली होती. आता भारतीय दूतावासानं अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्यासोबत संपर्क केला असून तिला सुरक्षितपणे मुंबईत आणलं जात आहे. दरम्यान चित्रपट निर्मता नितीन वैद्य यांनी रात्री नुसरत भरूचा हिला विमानतळापर्यंत आणलं गेलं होतं, मात्र एअर इंडियाचं विमान रद्द झाल्यानं अडचण आल्याचं स्पष्ट केलं आहे.

शनिवारी दुपारी अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्यासोबत संपर्क झाला होता. मात्र त्यानंतर नुसरतसोबत संपर्क होत नव्हता. रात्री उशीरादेखील आम्ही नुसरत भरूचासोबत संपर्क करत होतो. रात्री विमानतळावर गेल्यानंतर नुसरत भरूचा हिच्यासोबत संपर्क झाला होता. मात्र एअर इंडियाचं फ्लाईट रद्द करण्यात आल्यानं नुसरत विमानतळावरच अडकली होती. आता पुन्हा एकदा अभिनेत्री नुसरत भरूचासोबत संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. - निनाद वैद्य, चित्रपट निर्माता

हमासच्या हल्ल्यात अडकली 'अकेली': अभिनेत्री नुसरत भरूचा ही हमासनं हल्ला केल्यानंतर इस्राईलमध्येच अडकली आहे. नुसरत भरूचाला सुरक्षित बाहेर काढून भारतात परत आणलं जात आहे. मात्र नुसरत भरूचानं अकेली या चित्रपटात इराकी युद्धात अडकलेल्या तरुणीची भूमीका साकारली आहे. या चित्रपटात कुटुंबाचं कर्ज फेडण्याची जबाबदारी घेतलेली मुलगी नोकरीसाठी इराकला जाते. त्यानंतर ती इराकमध्ये दहशतवादी संघटना आणि इराकी सैन्यात सुरु असलेल्या युद्धात अडकून पडते. त्यानंतर तिच्या सुटकेचा थरार या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरूचानं साकारला आहे. मात्र इस्राईलमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेलेल्या नुसरत भरूचा योगायोगानं हमासनं केलेल्या हल्ल्यात अडकली आहे. त्यामुळे चित्रपट कथेतील रिल लाईफ आणि नुसरत भरूचानं अनुभवलेली सत्यकथा हा योगायोगचं म्हणावा लागेल.

हाईफा चित्रपट महोत्सवासाठी गेली होती अभिनेत्री : अभिनेत्री नुसरत भरुचा ही हाईफा आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी इस्राईलला गेली होती. यावेळी अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यासोबत तिचे दोन क्रू मेंबरही गेले आहेत. मात्र हमासनं इस्राईलवर हल्ला केल्यानंतर हे सगळे एका ठिकाणी अडकले होते. अभिनेत्री नुसरत भरुचा ही एका सुरक्षित ठिकाणी असल्याचं शनिवारी दुपारी झालेल्या संपर्कानंतर स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यासोबत संपर्क झाला नसल्याचं चित्रपट निर्मिती संस्थेतील निनाद वैद्य यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र रात्री उशीरा नुसरत भरूचा हिला सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. तिला विमानतळावर नेण्यात आलं होतं, मात्र विमान रद्द करण्यात आल्यानं नुसरत इतर भारतीयांसोबत विमानतलावर अडकली होती.

दुबईमार्गे परतणार मुंबईत : शनिवारी दुपारी अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्यासोबत संपर्क झाला होता. मात्र त्यानंतर नुसरतसोबत संपर्क झाला नाही. रात्री उशीरादेखील आम्ही नुसरत भरूचासोबत संपर्क करत होतो, आता पुन्हा एकदा अभिनेत्री नुसरत भरुचासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असं चित्रपट निर्माता निनाद वैद्य यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना स्पष्ट केलं. दरम्यान रात्री उशीरा नुसरत भरूचा विमानतळावर पोहोचली होती. तिच्यासह इतर भारतीय नागरिक आहेत. मात्र एअर इंडियाचं विमान हमासच्या हल्ल्यामुळे रद्द करण्यात आलं. त्यामुळे नुसरत भरूचा तिथंच अडकली होती, असंही निनाद वैद्य यांनी यावेळी स्पष्ट केलं.

नुसरत भरुचासोबत दोन क्रू मेंबर : नुसरत भरूचा ही 'हायफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' ला उपस्थित राहण्यासाठी इस्त्रायलला गेली. शनिवारी दुपारी 12.30 ला तिच्याशी चित्रपटाच्या क्रू मेंबरचा शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले होते. चित्रपटाचे निर्माता नितीन वैद्य हे सुद्धा 'अकेली' च्या बुधवारी झालेल्या प्रिमियर शोसाठी टेल एविसला जाणार होते. पण त्यांनी काही कारणांमुळे हा दौरा रद्द केला. त्यामुळे दोन क्रू मेंबरसह नुसरत भरूचा ही इस्राईलला गेली होती.

हेही वाचा :

  1. हॉट गुलाबी बिकनीमध्ये दिसली नुसरत भरुचा
  2. Dream Girl 2 : ड्रीम गर्ल २'मध्ये कास्टिंग न झाल्याने नुसरत भरुचाचा तिळपापड...
Last Updated : Oct 8, 2023, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.