ETV Bharat / state

Ganesh Festival २०२३ : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; गणेशमूर्तीवर शिक्के न मारण्याचे महापालिकेला आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 7:39 AM IST

Updated : Sep 12, 2023, 12:35 PM IST

Ganesh Festival २०२३ : गणेशोत्सवात मुंबई महापालिका भक्तांना पर्यावरण पूरक गणेशमूर्तीचं वाटप करते. मात्र या गणेशमूर्ती ओळखण्यासाठी मूर्तीवर शिक्का मारण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे शिक्के न मारण्याचे आदेश दिले आहेत.

Ganesh Festival 2023
संग्रहित छायाचित्र

मुंबई Ganesh Festival २०२३ : पर्यावरण पूरक गणेशमूर्ती समजाव्यात, यासाठी महापालिकेच्या वतीनं गणेशमूर्तीवर शिक्का मारण्यात यावा, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र हा गणेश भक्तांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे गणेशोत्सवात ( Ganesh Festival ) देण्यात येणाऱ्या मूर्तींवर कोणताही शिक्का मारण्यात येऊ नये, असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या या आदेशानं महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरु आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली : मुंबई महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा, यासाठी महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. मात्र त्यांच्या या निर्णयावर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आक्षेप घेतला. गणेशोत्सव हा लाखो हिंदूंच्या आस्थेचा विषय असल्यानं या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्राद्वारे कळवलं आहे.

गणेशोत्सव आस्थेचा विषय : गणेशोत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे. मुंबईत या उत्सवाचं विशेष महत्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही. याची बारकाईनं काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणं किंवा रंग देणं योग्य नाही. यामुळे असंख्य भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा, यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना दिल्याची माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Ganesh idol : प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती वापरल्यास गुन्हे दाखल होणार
  2. BMC Regulations For Ganesh Idol: घरगुती गणपतीसाठी मुंबई पालिकेची नियमावली; मूर्तिकारांसोबत गणेश भक्तही संभ्रमित
Last Updated : Sep 12, 2023, 12:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.