ETV Bharat / state

Mumbai fire news : मुंबईतील माझगाव अहमद बिल्डिंगला आग, आगीच्या घटनांचे सत्र सुरूच

author img

By

Published : Oct 28, 2022, 3:50 PM IST

Updated : Oct 28, 2022, 5:23 PM IST

मुंबईत दिवाळी पासून आगीचे सत्र सुरू ( Mumbai fire incident ) झाले आहे. आज पहाटे कुर्ला एल. बी. एस. रोड येथे आग लागली होती. त्यानंतर आता दुपारी माझगाव येथील महापुरुष मंदिर मार्ग अहमद बिल्डिंग मधील एका घराला दुपारी आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची ( No one injured in the fire ) माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Mumbai fire news
मुंबईतील माझगाव अहमद बिल्डिंगला आग

मुंबई - मुंबईत दिवाळी पासून आगीचे सत्र सुरू ( Mumbai fire incident ) झाले आहे. आज पहाटे कुर्ला एल. बी. एस. रोड येथे आग लागली होती. त्यानंतर आता दुपारी माझगाव येथील महापुरुष मंदिर मार्ग अहमद बिल्डिंग मधील एका घराला दुपारी आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची ( No one injured in the fire ) माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

मुंबईतील माझगाव अहमद बिल्डिंगला आग लागली होती.

आग नियंत्रणात - मिळालेल्या माहितीनुसार, आज २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भायखळा पोलीस ठाणे हद्दीत रुम नंबर ३३, अहमद बिल्डींग, गणपावडर रोड माझगाव मुंबई येथे नरेश जैन यांच्या मालकीच्या घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर ऑफिसर शिंदे, शेख व भायखळा अग्निशमन दलाने १२.४८ वाजता आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सदर आगीत रुममधील सर्व सामानाचे नुकसान झाले असून सदर आगीत कोणतीही जीवित हानी नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या ठिकाणी भायखळा पोलीस ठाणेचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत ( Senior Police Inspector Ashok Khot ) यांनी कळविले आहे.

Mumbai fire news
मुंबईतील माझगाव अहमद बिल्डिंगला आग लागली होती.


सकाळी कुर्ल्यात आग - कुर्ला परिसरात आज पहाटे ३.३० च्या सुमारास एलबीएस रोडवर एका कॉम्प्युटर पार्ट्सच्या दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कुर्ला पश्चिम एलबीएस रोडवर अनेक दुकाने आहेत ज्यात जुने संगणक, कार आणि इतर प्रकारची दुकाने आहेत. जे एकमेकांना लागून आहेत. अशा परिस्थितीत अग्निशमन दलाला वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, अन्यथा हा अपघात आणखी भीषण होऊ शकला असता. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, दुकानात ठेवलेला लाखो रुपयांचा माल व संगणकाचे सुटे भाग जळून खाक झाले आहेत.

Last Updated : Oct 28, 2022, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.