ETV Bharat / state

Election on 5th June : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला निवडणूक

author img

By

Published : May 11, 2022, 10:19 PM IST

Election
निवडणूक

राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील ( in Zilla Parishad and Panchayat Samiti ) 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून (Election on 5th June for vacancies ) रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

मुंबई: राज्यातील पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला या जिल्हा परिषदांतील दोन निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील सहा गणांच्या निवडणुका 5 जून 2022 रोजी होणार आहेत. तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.


नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील.

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल. अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

हेही वाचा : Mahavikas Aghadi : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी शक्य?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.