ETV Bharat / state

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर्मनीसह इंग्लंडचा दौरा पुढे ढकलला, नेमकं कारण काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 3:49 PM IST

मुख्यमंत्री पुढच्या ऑक्टोबर महिन्यात बर्लिन, जर्मनी आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पूर्वनियोजित विदेश दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे.

Eknath Shinde News
Eknath Shinde News

मुंबई Eknath Shinde News: राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर आहे. असे असले तरी वैयक्तिक कारणानं मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलल्याचा सांगण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले जगंदबा तलवार आणि वाघनखे आणण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.


आमदार अपात्रता व आरक्षणाचा मुद्दा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोंबरपासून बर्लिन, जर्मनी आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार होते. १ ते १० ऑक्टोबरपर्यंत असा हा १० दिवसांचा त्यांचा दौरा होता. परंतु सध्या महाराष्ट्रात आमदार अपात्रता मुद्दा गाजत असून काल (२५ सप्टेंबर) सोमवारी त्याबाबत सुनावणी झाली. याप्रकरणी शिंदे गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उपस्थित राहावं लागणार आहे. याबाबत पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आलीय. त्याचप्रमाणं सध्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून राज्यात रान पेटलं आहे. त्यामुळे सध्याचे राजकीय वातावरण पाहता त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासकिय अधिकारीही उपस्थित राहणार होते.


दौऱ्यावरून विरोधकांची टीका- महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या परदेश दौऱ्यावरून विरोधकांनीसुद्धा टीकेची झोड उठवली होती. ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावरून टीका केली होती. मुख्यमंत्री या दौऱ्यात जर्मनीसोबत उद्योग तंत्रज्ञानांशी संबधित करार करणार होते. महामार्गावरील वाढते अपघात करण्यासाठीदेखील बर्लिनमधील व्यवस्थापनाची मदत घेतली जाणार आहे. तसेच तेथील मराठी भाषिक जनतेशी मुख्यमंत्री शिंदे संवादही साधणार होते. आता पुढे हा दौरा कधी आखला जाईल, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.



वाघनखे व जगदंब तलवार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लंडनला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईत वापरलेली वाघनखे घेऊन येणार ३ ऑक्टोंबर रोजी याबाबत लंडन येथे करारसुद्धा करणार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे राज्याभिषेकाचं ३५० वे वर्ष असल्याने मराठ्‌यांच्या जाज्वल्य इतिहासाचा वारसा सांगणारी जगदंब तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी लंडन सरकारबरोबर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

हेही वाचा-

  1. MLA Disqualification Hearing : आमदार अपात्रते प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार, दोन्ही गटांच्या वकिलांनी केला युक्तीवाद
  2. CM Shinde On Dhangar Reservation: धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक- मुख्यमंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.