ETV Bharat / state

ED Raid In Mumbai : कोविड खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीची मुंबईत सात ठिकाणी छापेमारी; महापालिका अधिकारीही टार्गेटवर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 7:05 PM IST

ED Raid In Mumbai : कोविड खिचडी घोटाळा प्रकरणी (Covid Khichdi scam case) मुंबईत बुधवारी ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली. (ED raids at BMC officials house) याअंतर्गत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सुरज चव्हाण यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांचे आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील तपास करत आहे.

ED Raids In Mumbai
ईडी

ईडीच्या छाप्यांविषयी बोलताना किरीट सोमैया

मुंबई : ED Raid In Mumbai : मुंबईतील महानगरपालिकेच्या गरीब कामगारांना कोविड काळात खिचडी वाटप करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला होता. यासाठी मुंबई महानगरपालिकेने 50 कंत्राटदार नेमून 160 कोटी रुपयांच्या खिचडीचे वाटप केल्याचे दाखवले आहे. (ED raids at Suraj Chavan) पाच कोटी पॅकेट्स कामगारांना वाटल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, या खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. (Enforcement Directorate) याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील तपास करत आहे. याप्रकरणी ईडीची मुंबईत सात ठिकाणी छापेमारी आज सकाळपासून सुरू आहे.



'यांच्या' बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप: १३२ कोटीच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मुलगा, मुलगी, भागीदार आणि अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. खिचडी वाटपाचे कंत्राट पन्नास कंत्राटदारांना महानगरपालिकेतर्फे देण्यात आले होते. यापैकी 12 पेक्षा अधिक कंत्राटदार बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खिचडी वाटपामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचाही समावेश असल्याचा दावा किरीट सोमैया यांनी केला आहे. 50 कंत्राटदारांना 132 कोटी 89 लाख रुपये वितरित केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. यापैकी राजीव साळुंखे या केईएम रुग्णालयासमोर रिफ्रेशमेंट चालवणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये दहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सह्याद्री रिफ्रेशमेंट या नावाने वैश्य सहकारी बँकेत हे खाते असून या खात्यामध्ये खिचडी वाटपाचे पैसे वर्ग करण्यात आले असे सोमैया यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे सुरज चव्हाण यांच्यासह गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांची कोविड खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती.


संजय राऊतांच्या भावाची चौकशी: मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ६ ऑक्टोबरला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे भाऊ संदीप राऊत यांची तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली होती. ते ६ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास राऊत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून निघाले. त्यावेळी राऊत यांनी मी कोणता घोटाळा केला नाही. संजय राऊतांचा भाऊ असल्याने आपल्याला त्रास दिला जातोय, असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

हेही वाचा:

  1. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?
  2. ED Raid in Mumbai : कोव्हिड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची दोन दिवस कारवाई, आतापर्यंत काय घडले?
  3. Devendra Fadnavis On Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, कोणालाही...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.