ETV Bharat / state

sanjay Raut on ED : ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे

author img

By

Published : Mar 8, 2022, 4:56 PM IST

Updated : Mar 8, 2022, 5:24 PM IST

ईडी ही भाजपची एटीएम मशिन झाली आहे. (ED has become the ATM machine of BJP) असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. इडीच्या खंडणी रॅकेट संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरु केली असुन लवकरच ईडीचे काही अधिकारी तसेच एजंट लवकरच जेल मधे जातील असेही त्यांनी सांगितले.

sanjay Raut
संजय राऊत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या बहु प्रतिक्षित पत्रकार परिषदेत आज त्यांनी स्पष्ट केले की,आज मुंबईत धाडीवर धाडी सुरु आहेत. मग आम्ही सुद्धा विचार केला की, आपण पण धाड टाकावी, सध्या आयटी ईडीची भानामती सुरु आहे. शिवसनेनेला, महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) त्रास देण्यासाठी या धाडी सुरु आहेत. महापालिका निवडणुका होई पर्यंत या धाडी सुरुच राहणार आहेत. इनकम टॅक्स आणि ईडीला आतापर्यंत मी 50 भ्रष्टाचाऱ्यांची नावे दिली आहेत ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. आता आम्ही केंद्रिय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्या शिवाय राहणार नाहीच. केंद्रिय मंत्र्यांविरोधात किरीट सोमैय्यांनीच पुरावे दिलेले आहेत. मग केंद्रीय यंत्रणा त्या मंत्र्यांच्या घरावर धाडी का टाकत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

एका दूधवाल्याकडे 8 हजार कोटींची संपत्ती कुठून आली, 2-4 वर्षात एखाद्याचे उत्पन्न करोडोने कसे वाढते मलबार हिल सारख्या भागात त्याची हवेली उभी राहते. हे ईडी आणि आयकर विभागाला दिसत नाही का? त्यांनी आपला चष्मा बदलायला पाहिजे. सोमैय्या हे ईडीचे वसुली एजंट आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना भाजपकडून तिकिट दिले जाते असा आरोपही त्यांनी केला आहे.

आम्ही ईडी आयटीची भानामती उघडकीस आणनारच, तुम्ही माझ्यावर रेड टाकू शकता मला अटक करु शकता. हे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, ईडी आणि ईडीचे काही अधिकारी भाजपची एटीएम मशिन बनली आहेत मी पंतप्रधानांना सविस्तर पुरावेही दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानात केवळ कचराच नव्हे तर भ्रष्टाचारही साफ करा हे माझे पंतप्रधानांना सांगणे आहे. राजकीय विरोधकांसोबत इडी काय करतेय याचा पाढाच त्यांनी वाचला. मी सध्या 1 पार्ट दिला आहे असे 10 पार्ट देणार असेही त्यांनी सांगितले.

ईडीचे काही एजंट अधिकारी बिल्डर्स, नौकरशहा, कॉर्पोरेटर्सना धमकावतात तसेच काहींवर कारवाई करतात यात जितेंद्र ललवाणी नावाचा एक अधिकारी आहे. त्याच्या नावावर 7 कंपण्या आहेत त्यात 100 करोड पेक्षा जास्तची वसुली झाली आहे. थेट पैसा तसेच चेक तसेच डि़जीटल पेमेंट ही घेतले गेले आहेत. ईडी ने ज्यांच्या ज्यांच्या चौकशा केल्या त्यांनी यांच्या या कंपन्यात हा पैसा टाकलेला आहे. असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, 2017 मधे इडी ने दिवान हाऊसिंग फायनांन्स ची चौकशी केली त्यांच्या कडून या ललवाणी च्या कंपन्यात 40 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. अविनाश भोसलेची चौकशी झाली त्यांच्या कंपनीतुन या कंपन्यात 10 कोटी रुपये कंपन्यात ट्रान्सफर झाले. असे उदाहरणेही त्यांनी दिले.

मी ज्या गोष्टी सांगत आहे या बाबत पंतप्रधानांना माहिती आहे. केंद्राच्या व्हिजीलन्स मधेही त्या प्रकारचा अहवाल आलेला आहे. जितेंद्र नवलानी आणि इडी च्या 4 अधिकार्यांची चौकशी करावी यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना भ्रष्टाचार आणि खंडणीची तक्रार केली आहे आणि मुंबई पोलीस त्याची चौकशी सुरु करत आहे. या सगळ्या प्रकारात भाजपचे काही नेते पण सहभागी आहेत. चौकशी होताच इडीचे काही अधिकारी आणि एजंट जेल मधे जातील हे सांगताना त्यांनी किरीट सौमय्याचाही समाचार घेतला.

महान महात्मा किरीट सोमैया सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात सोमैय्यांचे वाधवानसोबत आर्थिक संबंध काय ? वाधनवानला बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुन पैसे घेतले वाधवान आरोपी असताना त्याच्यासोबत व्यवहार कसा केला असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी किरीट आणि नील सोमैया जेलमध्ये जाणार याचा पुर्नउच्चार केला.

Last Updated :Mar 8, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.