ETV Bharat / state

मुंबई : चक्रीवादळामुळे 50पेक्षा जास्त लोकलला लेटमार्क; तर 16 लोकल रद्द

author img

By

Published : May 17, 2021, 10:38 PM IST

तौक्ते चक्रीवादळामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची मालिका सुरू होती. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील शिवडी-कॉटनग्रीन,घाटकोपर, डोंबिवली येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या. चुनाभट्टी-जीटीबी नगर येथे ओएचइमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मस्जिद येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती.

mumbai local
मुंबई लोकल

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवाला बसला आहे. रेल्वे रुळावर आणि लोकलवर झाडांच्या फांद्या वेगवेगळ्या ठिकाणी कोसळण्याचा दुर्घटनेमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील 16 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर मध्य आणि पश्चिम मार्गावर 50पेक्षा जास्त लोकल उशिराने धावल्या आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी लेट मार्क लागला.

लोकलचे वेळा पत्रक कोलमडले -

तौक्ते चक्रीवादळामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची मालिका सुरू होती. ज्यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील शिवडी-कॉटनग्रीन,घाटकोपर, डोंबिवली येथे झाड पडण्याच्या घटना घडल्या. चुनाभट्टी-जीटीबी नगर येथे ओएचइमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मस्जिद येथे पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पत्रे कोसळण्याचा घटना घडल्या आहे. परिणामी, दिवसभर लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडून पडले होते. त्यांच्या फटका अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बसला आहेत. उपनगरीय लोकलमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावत आहेत. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावर एकूण 1 हजार 392 लोकल फेऱ्या धावतात. मात्र, आज या लोकल फेऱ्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा - नायर रुग्णालयाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका; पावसामुळे कोविड ओपीडी, लसीकरण केंद्रात पाणी

16 लोकल फेऱ्या रद्द -

चक्रीवादळामुळे रेल्वेमार्गावर दिवसभर दुर्घटना घडण्याची मालिका सुरू होती. त्यामुळे अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे लोकल खोळंबा झाल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला. अनेक प्रवाशांचा जादा वेळ एकाच ठिकाणी थांबलेल्या लोकलमध्ये गेला. बहुतेक प्रवाशांनी रेल्वे मार्गावर उतरून पायपीट करून जवळचे स्थानक गाठले. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील 16 लोकल रद्द आणि 50 लोकल फेऱ्या उशिराने धावत होत्या, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

हेही वाचा - अरबी समुद्रात अडकलेल्या 273 जणांना वाचवण्याचे नौदलाचे प्रयत्न सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.