ETV Bharat / state

Drug Seized In Mumbai: अंमली पदार्थ विरोधी पथकाचं 'ऑल आऊट ऑपरेशन' यशस्वी, ८८ लाखांचं ड्रग्ज केलं जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 8:10 PM IST

Drug Seized In Mumbai: मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान आणि वांद्रे युनिट्सच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) (Anti narcotics squad) जोगेश्वरी, सांताक्रूझ आणि धारावी परिसरातून 5 अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आणि 88 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. (MD Drugs Seized) पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून ही माहिती दिली गेली.

Drug Seized In Mumbai
८८ लाखांचं ड्रग्ज केलं जप्त

मुंबई Drug Seized In Mumbai: मुंबई पोलिसांनी 355 ग्रॅम एमडीसह 5 ड्रग्ज तस्करांना पकडलं आणि नोटा मोजण्याच्या मशीनसह 16.5 लाख रोख हस्तगत केले. 'ऑल आउट ऑपरेशन'मध्ये (All Out Operation) एकूण 88.40 लाखांचा मुद्देमाल आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. जोगेश्वरी, सांताक्रूझ आणि धारावी परिसरातून 355 ग्रॅम एमडी (एमफेडिओन) जप्त केलं. (Action on Drug Traffickers) अटक आरोपींच्या घरातून 16 लाख 50 हजार रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. (Mumbai Crime) एक नोट मोजण्याचं यंत्र, विद्युत वजनाचं यंत्र आणि एक दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.


आरोपींची सखल चौकशी सुरू: आझाद मैदान अंमली पदार्थ विरोधी युनिटला २ नोव्हेंबरला जोगेश्वरी पूर्व भागात एमडी ताब्यात असलेला एक संशयित व्यक्ती आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोगेश्वरी पश्चिम परिसरातून एमडी घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला, ज्याच्या चौकशीत त्याने सांताक्रूझ परिसरातून एमडी घेतलं असल्याचं सांगितलं. पुन्हा पोलिसांनी तिसर्‍या व्यक्तीचा शोध घेतला असता 200 ग्रॅम एमडी आणि १५ लाख रोख रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं. पोलिसांनी या आरोपीकडून रोकड मोजणी यंत्र देखील हस्तगत केलं. एकूण जप्त केलेल्या सर्व मालमत्तेची किंमत 75 ते 70 लाख इतकी आहे. इतर महत्त्वाच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींची सखोल चौकशी सुरू आहे.

अनेक ड्रग्ज नेटवर्क उद्धस्त: वांद्रे अंमली पदार्थ विरोधी युनिट २ नोव्हेंबरला गस्त घालत असताना एक व्यक्ती त्याच्या घरातून ड्रग्ज विकत असल्याची माहिती मिळाली. या पथकानं त्याच्या घराची झडती घेतली आणि एमडीसह एक व्यक्ती सापडला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील व्यक्तीकडून एमडी घेतल्याचं सांगितलं. दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्याच्याकडे एमडी आढळून आले. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण 55 ग्रॅम एमडी मेफेड्रोन जप्त करण्यात आलं आहे. एकूण 12.70 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज टिलक रौशन यांनी दिली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकालाच्या 'डे अँड नाईट ऑल आऊट ऑपरेशन'मध्ये मुंबई पोलिसांनी विविध ड्रग ट्रॅफिकिंग सिंडिकेट्सचा पर्दाफाश केला. त्यामुळे मुंबई शहरातील अनेक ड्रग्स नेटवर्क्स उध्वस्त झाली आहेत.

हेही वाचा:

  1. Cocaine Seized By DRI Mumbai: मुंबईत कोकेनपासून बनवलेल्या ५० विटा जप्त, किंमत 502 कोटी रुपये
  2. MD Drug Seized In Palghar : पालघरमध्ये एएनसी पथकाची मोठी कारवाई; 1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त
  3. Raid On Drug Factory : सोलापूरच्या ड्रग्ज कारखान्यातून नाशिकला व्हायचा ड्रग्ज पुरवठा; लाखो रुपयांचा माल जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.