ETV Bharat / state

वायग्रासारख्या औषधांची विक्री करण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 9:19 PM IST

Bogus Call Center Case: बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना औषधे विक्री करण्याचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक करणारी टोळी उध्वस्त करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आलं आहे. (Stimulant Drug Sale) कॉल सेंटरमधील टोळी फोनद्वारे काही उत्तेजक औषधी विक्रीचे अमेरिकी नागरिकांना आमीष दाखवायचे. (Mumbai Crime Branch) यानंतर त्यांच्याकडून डॉलर घ्यायचे. पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी याविषयी माहिती दिली आहे.

Deceiving American citizens
बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

मुंबई Bogus Call Center Case : बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना औषधे विक्री करण्याच्या नावाखाली त्यांची लूट करणाऱ्या टोळीच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने आवळल्या आहेत. (Fraud with American) 12 जानेवारीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. (Dollar Fraud) याआधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधेरी पूर्व येथील वेस्टन एक्सप्रेस मेट्रो स्टेशन जवळ असलेल्या 'द समिट बिजनेस बे' येथे व्ही 3 ग्लोबल सर्विसेसमध्ये काही इसम बेकायदेशीरपणे कॉल सेंटर चालवत आहेत, असे पोलिसांना कळले. या कॉल सेंटरमध्ये इंटरनेट कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना कॉल करून औषध विकण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जायची.

छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश: या घटनेची माहिती मिळताच कक्ष 10 यांच्या पथकाने 12 जानेवारीला उशिरा रात्री अंधेरी पूर्व येथील व्ही 3 ग्लोबल सर्विसेस या ठिकाणी छापा टाकून शहानिशा केली. यामध्ये पोलिसांनी या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी एकूण २३ संगणकाला जोडलेल्या हेडफोन माईक वरून लिगल गेटवे बायपास करून इंटरनेटद्वारे व्हीओआयपी कॉल केले जात असल्याचे आढळले.

अशा प्रकारे करायचे फसवणूक: हे भामटे स्वत:ला अमेरिकी नागरीक असल्याचं भासवून ऑनलाईन फार्मसी (स्टेटस ऑनलाईन फार्मासी, गेट फार्मासी आणि टाईम हेल्थ) या खोट्या कंपनीच्या माध्यमातून बोलत असल्याचं सांगून खोट्या नावाचा वापर करायचे. अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये कॉल करून व्हायग्रा, सिआलीस आणि लिवेट्रो इत्यादी औषधे विकण्याचं आमीष दाखवून त्यांची ऑर्डर घ्यायचे. यानंतर त्यांच्याकडून ऑनलाईन डॉलरमध्ये पैसे घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करीत असल्याचं दिसून आलं.

'या' कलमान्वये गुन्हा दाखल: 13 जानेवारीला फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटर मधील सर्व संगणकीय आणि इतर इलेक्ट्रीक साधन सामुग्री ताब्यात घेण्यात आली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आरोपींवर भारतीय दंड संविधान कलम ४१९, ४२०, २०१ आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम कलम ६६ (सी) (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एकूण १० आरोपींना अटक केली असून पुढील तपास कक्ष १० करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. मिलिंद देवरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश; खासदारकी लढवण्याचे दिले संकेत
  2. मिलिंद देवरांची पत्नी पूजा शेट्टीचं बॉलिवूडसोबत आहे अनोखं नातं; जाणून घ्या लव्हस्टोरी
  3. हवाई दलाच्या कसरतींनी जिंकले मुंबईकरांचे मन; 'एअर शो' पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.