Death Threats To Celebrities : 'या' सेलिब्रिटींना मिळाल्या आहेत धमक्या; जाणून घ्या, मुंबई पोलिसांचा Full Security प्लॅन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 8:39 PM IST

Death Threats To celebrities

Death Threats To Celebrities : बॉलिवूड कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळणं नवीन नाही. या आधी देखील सलमान खान, अमिताभ बच्चन यांसारख्या सुपरस्टार्सला धमक्या मिळाल्या आहेत. जेव्हा जेव्हा बॉलिवूड कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. याबाबतच घेतलेला हा आढावा..

मुंबई Death Threats To Celebrities : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं यावर्षी पठाण आणि जवान या दोन चित्रपटांतून जोरदार कमबॅक केला. त्याच्या या चित्रपटांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या घवघवीत यशानंतर किंग खान आता गँगस्टरच्या निशाण्यावर आलाय. शाहरुख खानच्या जीविताला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली असून त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला 'वाय प्लस' सुरक्षा पुरवली आहे.

सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला 'वाय प्लस' सुरक्षा पुरवली. सलमान खानच्या कर्मचाऱ्याला एक मेल प्राप्त झाला होता. त्या मेलमध्ये सलमान खानचा 'मुसेवाला' करू अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत लगेच वाढ केली.

या सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे : 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि 'द केरला स्टोरीज' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'द केरला स्टोरीज' या चित्रपटाच्या क्रू मेंबर्सना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासह क्रू मेंबर्सच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. बीग बी अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून 'एक्सट दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत इस्रायलच्या खाजगी एजन्सीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेसाठी ५५ लोकांचा ताफा आहे.

सुरक्षेसाठी शुल्क भरावं लागतं का? : सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिवाला धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षा कवच पुरवलं जातं. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना राज्य सरकारकडून नि:शुल्क सुरक्षा पुरवली जाते. मात्र काही नागरिकांना सुरक्षेसाठी शुल्क भरावं लागतं किंवा सुरक्षा रक्कम जमा करावी लागते. हे शुल्क त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असतं.

कोणकोणत्या दर्जाची सुरक्षा असते : पोलिसांकडून 'एक्स', 'वाय', 'वाय प्लस', 'झेड' आणि 'झेड प्लस' अशा दर्जाच्या पाच सुरक्षा पुरवल्या जातात. 'एक्स' दर्जाच्या सुरक्षेमध्ये दिवस पाळीसाठी आणि रात्र पाळीसाठी एक पोलीस अंमलदार दिला जातो. 'वाय' सिक्युरिटीसाठी दिवसा आणि रात्री साठी एक पोलीस हवालदार, निवासस्थानी एक हवालदार यासह दहा पोलीस पुरवले जातात.

कोणत्या दर्जाच्या सुरक्षेत काय सुविधा दिल्या जातात : सध्या शाहरुख खानला पुरवण्यात आलेल्या 'वाय प्लस' सुरक्षेसाठी दोन पोलीस अंमलदार आणि एक पोलीस ऑफिसर आहे. तसेच शाहरुखच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ व्हॅनमध्ये एक चालक आणि दोन शस्त्रधारी पोलीस असणार आहेत. 'झेड' सिक्युरिटीमध्ये एस्कॉर्ट व्हॅनसह एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस हवालदार असतात. तर 'झेड प्लस' सिक्युरिटीमध्ये दोन पोलीस अधिकारी आणि सहा पोलीस हवालदार सुरक्षेच्या ताफ्यात असतात. ही सुरक्षा दिवसा आणि रात्री पुरवली जाते. 'झेड प्लस' सिक्युरिटीमध्ये दिवसा आणि रात्री १८- १८ पोलिसांचा ताफा तैनात केला जातो. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि खिलाडी अक्षय कुमार यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र सुपरस्टार आमिर खानला कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही.

'मन्नत' बाहेर पोलिसांचा २४ तास पहारा : शाहरुख खानला मिळणाऱ्या धमक्यांचा पार्श्वभूमीवर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्याला 'वाय प्लस' सुरक्षा देण्यात आल्याची माहिती सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली. आता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर पोलिसांचा २४ तास पहारा असणार आहे. दिवसा ६ आणि रात्री ६ असे एकूण १२ पोलीस शाहरुख खानच्या सुरक्षेच्या ताफ्यात असतील.

हेही वाचा :

  1. Y Plus security for SRK : शाहरुख खानला ठार मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी दिली 'वाय प्लस' सिक्युरिटी
  2. ShahRukh Khan Fans Riot : मालेगावला शाहरुख खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, चित्रपटगृहात फोडले फटाके...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.