ETV Bharat / state

Drugs Party Case : आर्यन खान ड्रग प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची वाढीव मुदत

author img

By

Published : Mar 31, 2022, 1:24 PM IST

Updated : Mar 31, 2022, 3:53 PM IST

कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीवर (Cordelia Cruise Drugs Party) नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Bureau of Narcotics Control) 2 ऑक्टोंबर रोजी धाड टाकली आणि आर्यन खान (Aryan Khan) सह 20 आरोपींना पकडले. या प्रकरणाला आज 180 दिवस आज पूर्ण झाले. मात्र या प्रकरणात शेवटचा दिवस असतानाही आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. मात्र आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष एनसीबी पथकाने आणखी 90 दिवस ( The NCB asked for another 90 days for the chargesheet) वेळ मागितला आहे. न्यायालयाने 60 दिवसांची मुदत मंजूर केली आहे.

Aryan Khan
आर्यन खान

मुंबई- बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ( Bureau of Narcotics Control ) मागणी मुंबई सत्र न्यायालयाने मंजुर केली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाने निकाल एनसीबीला या प्रकरणात 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचे मंजुरी दिली आहे.

आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात ( Cordelia Cruise Drugs Party ) प्रमुख आरोपी आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी बुधवारी दोन तासांहून अधिक काळ पक्षकारांची युक्तीवाद ऐकून घेतला. निकाल राखून ठेवला होता, एनसीबीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याकरता 90 दिवसांचा वेळ आणखी मागितला होता. न्यायालयाने निकाल देत 60 दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे.

असा झाला युक्तीवाद- विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी युक्तिवाद केला, की आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याच्या अर्जामध्ये सक्तीची कारणे होती. सेठना यांनी युक्तिवाद केला की अर्ज 180 दिवसांच्या कालावधीत दाखल केला गेला आहे. जो आरोपपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. जरी कालावधी संपल्यानंतर अर्जावर निर्णय घेतला गेला तरी, तो आरोपीला जामीन देण्यास पात्र होणार नाही. सेठना यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की 15 प्रमुख संशयितांचे जबाब बाकी आहेत. काही आरोपी एकमेकांशी जोडलेले असल्याने त्यांचा तपास सुरू आहे. तर या प्रकरणात कोठडीत असलेल्या दोन आरोपींपैकी एक अब्दुल कादर शेख यांचे वकील कुशल मोर यांनी हा अर्ज म्हणजे आरोपींना तुरुंगात ठेवण्याचा डाव असल्याचा युक्तीवाद केला होता.

नेमके प्रकरण काय? मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानला हा 27 दिवस तुरुंगामध्ये राहावे लागले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानची जामीन फेटाळून लावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.

हे आहेत आरोपी-सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह खानला सायंकाळी 7 नंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर के राजेभोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. संक्षिप्त सुनावणीनंतर खानला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, नुपूर सतीजा, गोमित चोप्रा, इश्मीत सिंग, अब्दुल कादिर, श्रेयस नायर, मनीष राजगरिया, अवीन साहू, गोपाल आनंद, समीर सैगल, मानव सिंघल, भास्कर अरोरा हे या प्रकरणातील आरोपी होते.

हेही वाचा-Raghunath Kuchik Case : रघुनाथ कुचीक यांची डीएनए टेस्ट करा, पीडित तरुणीची मागणी

हेही वाचा- Fire Broke Out in Currency note press : करन्सी नोट प्रेस परिसरात भीषण आग

हेही वाचा-Most Powerful Peoples In India : देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींची यादी जाहीर.. पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर, तर मुकेश अंबानी...

Last Updated : Mar 31, 2022, 3:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.