ETV Bharat / state

Compensation From Government: मोठा निर्णय! शासनाकडून शेतकऱ्यांना 25 लाख हेक्टर शेतीची नुकसान भरपाई

author img

By

Published : Nov 2, 2022, 9:03 PM IST

राज्यात गेल्या 30 दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (rain in maharashtra). या पार्श्वभूमीवर शासनाने पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. (Compensation from maharashtra government)

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई: राज्यात गेल्या 30 दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (rain in maharashtra). मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच खान्देशातही प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. (Compensation from maharashtra government)

20 लाख हेक्टर पेक्षा अधिक जमीन प्रभावित: राज्यामध्ये तज्ञांच्या अंदाजाने 36 लाख हेक्टर पिकांची सततच्या पावसामुळे नासधूस झाली आहे. या नुकसानीमुळे राज्यातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांचे अभ्यासक आणि नेते विजय जावंदिया यांच्याशी ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये 20 लाख हेक्टर पेक्षा अधिक शेत जमीन ही सततच्या पावसामुळे वाया गेली आहे. अनेक ठिकाणी पिकं पूर्णपणे आलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत ही दिलीच गेली पाहिजे. तर अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनी सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणताही आधार नाही आणि नुकसान ग्रस्त अनेक शेतकरी हे छोटे अल्पभूधारक असल्यामुळे त्यांना शासनाने आधार दिला पाहिजे, असे म्हटले आहे.

इतिहासात प्रथमच अशा प्रकारची नुकसान भरपाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले की, सततच्या पावसामुळे शेतीच्या पिकाला नुकसान झाले तरी नुकसान भरपाई कधीही मिळत नव्हती. इतिहासात प्रथमच अशी नुकसान भरपाई शासनाच्या वतीने दिली जात आहे. राज्यामध्ये 25 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे आणि हे सततच्या पावसामुळे झालेले आहे असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.