ETV Bharat / state

CORONA VIRUS : 'संकट गंभीर.. पण सरकार खंबीर, कोणी संधी म्हणून पाहू नये'

author img

By

Published : Mar 24, 2020, 6:48 PM IST

Updated : Mar 24, 2020, 8:32 PM IST

देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच संकट जरी गंभीर असले तरी सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी खंबीर आहे. जनतेनं समजूतदारपणा वाढवला पाहिजे. तुम्ही काही मदत करू नका फक्त घरी राहा, आवाहनही ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

CORONA VIRUS : 'संकट गंभीर.. पण सरकार खंबीर, कोणी संधी म्हणून पाहू नये'

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

⦁ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यंत्रणा थांबवली नाही

⦁ जनतेनं समजूतदारपणा वाढवला पाहिजे, रस्त्यावर फिरू नका, गांभीर्य ओळखा तसेच घराबाहेर पडून नका.

⦁ टेहळणी किंवा फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरात राहा, सुरक्षित राहा.

⦁ पोलिसांना धन्यवाद द्यायचं आहे, त्यांनी काही लाख मास्क धड टाकून पकडले..ह्या संकटाचा कोणी संधी म्हणून वापर करू नये, साठेबाजी करू नये

⦁ आपल्याकडे पुरेसा अन्न धान्य साठा आहे..

⦁ आपल्याकडे रक्ताचा तुटवडा होऊ शकतो, रक्तदान करू शकता तुम्हीही करा.. आणि जास्तीत जास्त रक्तदान शिबीर घ्या..

⦁ सर्व धार्मीक संस्थान मदतीसाठी पुढे येत आहे ही महत्त्वाची बाब आहे. लालबाग राजा गणपती संस्थानच्या वतीने रक्तदान केले जात आहे. त्यांचं मी कौतुक करत आहे

⦁ अनावश्यक प्रवास टाळा, प्रशाकीय यंत्रणावर ताण निर्माण होईल असं काही करू नका.

⦁ तुम्ही काही मदत करू नका फक्त घरी राहा, ही कळकळीची विनंती आहे.

⦁ संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे

⦁ मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आहे.

Last Updated : Mar 24, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.