ETV Bharat / state

'आमच्या अर्थसंकल्पावरही पुढचे ५-१० वर्षे असेच पुस्तक लिहा'

author img

By

Published : Mar 4, 2020, 7:53 PM IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर आधारीत 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चौफेर टोलेबाजी केली.

CM Uddhav thackeray comment on devendra fadnavis
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लिहून माझे काम सोपे केल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. केवळ मला अर्थसंकल्प कळावा म्हणून त्यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहले आहे. तुम्ही आमच्या अर्थसंकल्पावरही पुढचे ५-१० वर्षे असेच पुस्तक लिहा. कारण आमच्या उणीवा समजतील, असे ठाकरे म्हणाले. तसेच दुसऱ्याच्या खर्चाने आपला कार्यक्रम कसा करायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.

CM Uddhav thackeray comment on devendra fadnavis
पुस्तक प्रकाशन करताना मान्यवर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर आधारीत 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, आमदार उपस्थित होते.

CM Uddhav thackeray comment on devendra fadnavis
अर्थसंकल्पावर आधारीत 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे पुस्तक

हेही वाचा - 'फडणवीस उत्तम साहित्यिक होऊ शकतात, तसे झाल्यास आम्हाला सुगीचे दिवस'

हेही वाचा - 'अनियमितता असेल तर कारवाई व्हावी; पण, सिडकोचा थेट संबंध मुख्यमंत्र्यांशी नसतो'

हा प्रसंग तुमच्यामुळेच

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्रजी तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात मी भाषण करेल, असे मला कधीही वाटले नव्हते. मात्र, ही वेळ तुमच्यामुळेच आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मला खात्री आहे की, तुमच्या या पुस्तकामुळे अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजण्यास मदत होईल. त्यामुळे मीच हे पुस्तक वाचणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.