ETV Bharat / state

CM DCM Visited Ayodhya : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; मंदिर उभारणी कामाची केली पाहणी

author img

By

Published : Apr 9, 2023, 3:23 PM IST

Updated : Apr 9, 2023, 5:59 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेतले आहे. रामजन्मभूमी अयोध्या नगरीतील प्रभू श्रीराम मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Eknath Shinde visited Ayodhya
Eknath Shinde visited Ayodhya

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेतले आहे. रामजन्मभूमी अयोध्या नगरीतील प्रभू श्रीराम मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीव अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत हजारो समर्थक ‘शिवसैनिक’ होते. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी शिंदे म्हणाले, "मी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहे. आमच्यावर प्रभू रामाचा आशीर्वाद आहे, त्यामुळे 'धनुष्यबाण' (शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण) आमच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.

  • रामजन्मभूमी #अयोध्या नगरीतील रामलल्लाच्या मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने प्रभू श्रीरामाची महाआरती संपन्न झाली. यावेळी 'जय श्रीराम'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला.#JayShreeram #Ayodhya pic.twitter.com/MvEbtmVbNU

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राम मंदिर आमच्या अस्मितेचा विषय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आयोध्येत रामाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आमच्या भावना भगवान रामाशी जोडलेल्या आहेत. आयोध्येत रोज हजारो नागरिक दर्शनासाठी येत आहेत. मी त्या सर्वांचे आभार मानतो. सकाळ निघालेल्या रॅलीत हजारो रामभक्त उपस्थित होते. आम्ही याआधी देखील अयोध्येला आलो होतो. इथे आल्यावर माझ्या मनात आनंद दाटुन येत आहे असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

  • अयोध्येत नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिराच्या परिसराला भेट दिली. यावेळी राम मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली तसेच त्याची स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली. #JayShreeram #Ayodhya #RamMandirAyodhya #RamMandir pic.twitter.com/sMCnRMpon9

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझ्यासाठी आनंदाचा दिवस : येथे राम मंदिर व्हावे अशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. तसेच प्रत्येकाला एकच आशा होती की इथे राममंदिर व्हायला हवे. आम्ही दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराचे काम पाहण्यासाठी गेलो. एवढ्या वेगाने काम होईल असे कोणालाही वाटले नव्हते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच आशीर्वाद घेण्यासाठी आयोध्येत आलो आहे. माझ्यासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. हा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाहीव असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मी अयोध्येत आलो तेव्हा काही लोकांना ऍलर्जी झाली, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. या आयोध्या दौवऱ्यात शिंदे-फडणवीस यांच्यासह कॅबिनेट मंत्री, शिवसेना,भाजपचे आमदार, खासदार तसेच शिवसैनिक उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आज एकाच हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे-फडणवीस खुल्या वाहनातून राम मंदिराच्या दिशेने गेले. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात आली.

  • यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते. pic.twitter.com/5h3oQi351o

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Chandrakant Patil : शरद पवार पावरफुल नेते, ते नसतील तर विरोधकांचे दात-नखे गळून पडतील - चंद्रकांत पाटील

Last Updated : Apr 9, 2023, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.