ETV Bharat / state

Raj Thackeray : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले शिवतीर्थावर, राज ठाकरे यांची घेतली भेट

author img

By

Published : Oct 26, 2022, 4:58 PM IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीला आलेलं सर्व पीक वाया ( Crop Damage Due To Heavy Rains ) गेले. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्या केल्या ( Farmer Suicide Due To Crop Loss ) आहेत. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थया निवासस्थानी भेट घेतली.

Raj Thackeray
राज ठाकरे

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. काढणीला आलेलं सर्व पीक वाया ( Crop Damage Due To Heavy Rains ) गेले. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आल आहे. मोसमातल्या पावसाने आधीच एकतर पिकाची नासाडी केली होती. त्यात या परतीच्या पावसाने काढणीला आलेले पीक देखील वाया गेलं. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आता पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी हताश होऊन आत्महत्या केल्या ( Farmer Suicide Due To Crop Loss ) आहेत. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थया निवासस्थानी भेट घेतली.

राज ठाकरे

शर्मिला ठाकरे यांनी केले औक्षण : मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मुलं राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल ( Suicide Farmer Children Visited Raj Thackeray ) झाली. ही मुले शिवतीर्थावर येताच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या मुलांचा औक्षण केलं, त्यांना मिठाई आणि फराळ देऊन त्यांचं आपल्या घरात स्वागत केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील या मुलांची संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी दुःख जाणून घेतल्या. त्यावेळी राज ठाकरेंनी या मुलांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे असल्याचं आश्वासन देखील दिले आहे.

त्र्यंबकेश्वर येथील अनाथ मुले : ही सर्व मुलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा एकमेव आश्रम असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील अनाथ आश्रमातील आहेत. या सर्व मुलांना घेऊन ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शिवतीर्थवर दाखल झाले. त्यांची मागणी आहे की, हा आश्रम रजिस्टर संस्थेचे आहे. आश्रमाला मान्यता असली तरी या मुलांचं शैक्षणिक भविष्य देखील उज्वल व्हावं ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून या आश्रमाच्या इथेच मान्यता प्राप्त शाळा सुरू करावी असा त्यांचा प्रयत्न आहे. या मागणीसाठीच त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.