ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावर लहान मुलांचाही जाहीरनामा प्रसिद्ध

author img

By

Published : Oct 11, 2019, 10:52 AM IST

मुंबईतील लहान मुलांनी मुंबईत विविध भागात फिरत त्यांचे काय प्रश्न आहेत याचा आढावा घेतला आहे. व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी देखील आपला जाहीरनामा जनतेसमोर तसेच पक्षांसमोर मांडला आहे. आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी प्रत्येक पक्षांने आपल्या जाहीरनाम्यात नमूद कराव्यात यासाठी ही मुले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना जाऊन भेटणार आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई - विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत सर्वच पक्षांचे जाहीरनामे तयार झालेले आहेत. त्यामध्ये अनेक मुद्दे प्रत्येक पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहेत. परंतु लहान बालकांकडे म्हणजेच 18 वर्षाखालील बालकांच्या काय मागण्या याकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे मुंबईतील लहान मुलांनी मुंबईत विविध भागात फिरत त्यांचे काय प्रश्न आहेत याचा आढावा घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी देखील आपला जाहीरनामा जनतेसमोर तसेच पक्षांसमोर मांडला आहे.

युवा संस्था आणि बाल अधिकार संघर्ष संघटना यांनी संयुक्तपणे मुलांच्या घोषणापत्राबाबत काही दिवसांपूर्वी चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात सामाजिक संस्था आणि बाल प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चासत्रात बाल प्रतिनिधींनी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा, गटकार्य करून आणि मुलांच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांवर विचार विमर्श करून स्वतःचे घोषणापत्र तयार केले आहे. ज्या मुलांच्या संदर्भात राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत मुलांना काय वाटते, हे या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. सदर घोषणापत्र हे मुलांनी क्रियाशील सहभाग घेऊन मते मांडून एकमेकांशी चर्चा करून बनवलेले आहे. हे जे घोषणापत्र बनवल्यानंतर युवा सीसीडीटी, मुंबई इस्माईल ,प्रथम जीवंधरा, लाईफ ऑफ लाइफ प्रश्न या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी यावर अभ्यास केला. नंतर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - ईव्हीएमवर ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा - आंदोलकांची मागणी

या घोषणापत्रात, मुलांना सुरक्षित घर, वस्ती पातळीवर बाल संसाधन केंद्र तसेच नगरसेवक वार्ड स्तरांवर बाल सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण अधिकार कायद्याची अंमलबजावणी व्हावी, शाळा जवळ असाव्यात, सर्वांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत मिळावे, मुलांसाठी केंद्रीय परिवहनाची सुविधा असावी, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शहरांमध्ये झाडे तोडू नये तसेच नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करावे, दिव्यांग मुलांना परिवहन आणि शिक्षणाच्या दृष्टीने योग्य त्या सुविधा सरकारमार्फत द्याव्यात, अशा अनेक मागण्या त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात नमूद केल्या आहेत. आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी प्रत्येक पक्षांने आपल्या जाहीरनाम्यात नमूद कराव्यात यासाठी ही मुले प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना जाऊन भेटणार आहेत.

Intro:निवडणुकीच्या तोंडावर लहान मुलांनी केला आपला जाहीरनामा प्रसिद्ध

mh_mum_child_agenda_04_7205017
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत सर्वच पक्षांचे जाहीरनामे तयार झालेले आहेत. त्यामध्ये अनेक मुद्दे प्रत्येक पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहेत .परंतु लहान बालकांडे म्हणजेच 18 वर्षाखालील बालकांच्या काय मागण्या याकडे कोणाचे लक्ष जात नाही .त्यामुळे मुंबईतील लहान बालकांनी मुंबईत विविध भागात फिरत मुलांना काय प्रश्न आहेत याचा आढावा घेतला आहे. व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी देखील आपला जाहीरनामा जनतेसमोर तसेच पक्षांसमोर मांडलेला आहे.


युवा संस्था आणि बाल अधिकार संघर्ष संघटना यांनी संयुक्तपणे मुलांचे घोषणापत्र बाबत काही दिवसांपूर्वी चर्चासत्र वस्ती वस्तीत आयोजित केलं होतं. या चर्चासत्रात सामाजिक संस्था आणि बाल प्रतिनिधी उपस्थित होते. या चर्चासत्रात बाल प्रतिनिधींनी वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा करून गटकार्य करून आणि मुलांच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांवर विचार विमर्श करून स्वतःचे घोषणापत्र तयार केलेले आहे. ज्या मुलांच्या संदर्भात राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून काय अपेक्षा आहेत मुलांना काय वाटते हे या घोषणापत्रात नमूद केलेले आहे .सदर घोषणापत्र हे मुलांनी क्रियाशील सहभाग घेऊन मते मांडून एकमेकांशी चर्चा करून बनवलेले आहे .हे जे घोषणापत्र आहे ते बालकाने बनवल्यानंतर युवा सीसीडीटी, मुंबई इस्माईल ,प्रथम जीवंधरा, लाईफ ऑफ लाइफ प्रश्न या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी यावर अभ्यास केला आणि नंतर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे

या घोषणापत्रात मुलांना सुरक्षित घर वस्ती पातळीवर बाळ संसाधन केंद्र, तसेच नगरसेवक वार्ड स्तरांवर बाळ सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी, हे या घोषणा पत्रात नमूद केलेले आहे. शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. शाळा जवळ असाव्यात व सर्वांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत मिळावे मुलांसाठी बाळ केंद्रे परिवहनाची सुविधा असावी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शहरांमध्ये झाडे तोडू नये तसेच जिथे मिळेल त्या प्रमाणात नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करावे दिव्यांग मुलांना परिवहन आणि शिक्षणाच्या दृष्टीने योग्य त्या सुविधा सरकारमार्फत द्याव्यात सर्व मुलांना ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आधार कार्ड व ज्या इतर ओळखपत्राच्या आहेत त्या सहज मिळाल्या बेघर मुलांना हॉस्टेल व शाळेची सुविधा मिळणे गरजेचे आहे अशा अनेक मागण्या त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात नमूद केलेले आहे.

हा जाहीरनामा सर्व मुंबईतील मुलांनी एकत्र येत प्रसिद्ध केलेला आहे. आणि या आपल्या जाहीरनाम्यातील तरतुदी प्रत्येक पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात नमूद कराव्यात यासाठी ते प्रत्येक पक्षांच्या प्रमुखांना जाऊन भेटणार आहेत.


Body:।


Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.