ETV Bharat / state

Mumbai Serial Blasts Case : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल ; 29 वर्ष होते फरार

author img

By

Published : Nov 15, 2022, 11:05 AM IST

मुंबईत झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात (accused in 1993 Mumbai serial blasts case) 29 वर्षानंतर पकडलेल्या चार आरोपींविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये 81 पानाचे आरोप पत्र दाखल केले (Charge sheet filed against accused )आहे.

Mumbai Serial Blasts Case
मुंबई सत्र न्यायालय

मुंबई : मुंबईत झालेल्या 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात (accused in 1993 Mumbai serial blasts case) 29 वर्षानंतर पकडलेल्या चार आरोपींविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये 81 पानाचे आरोप पत्र दाखल केले (Charge sheet filed against accused )आहे. या आरोप पत्रात सीबीआयने असे म्हटले आहे, की हे चार आरोपी दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निवासस्थानी झालेल्या कटाच्या बैठकीत सहभागी होते. 29 वर्षे फरार झाल्यानंतर यावर्षी मे महिन्यात या चौघांना अटक करण्यात आली होती.


आरोपपत्र दाखल : अबू बकर, मोहम्मद सईद, मोहम्मद शोएब कुरेशी आणि मोहम्मद युसूफ इस्माईल शेख यांना गुजरात एटीएसने मे महिन्यात अहमदाबादमधून अटक केली होती. सीबीआयने या महिन्यात त्यांच्याविरुद्ध दहशतवाद कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले (Mumbai Serial Blasts Case) आहे.

सीबीआयचा दावा : सीबीआयने दावा केला आहे की, हे आरोपी कटाचे सक्रिय सदस्य होते. बॉम्बस्फोट घडवण्याच्या अगोदर जानेवारी ते फेब्रुवारी 1993 मध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेण्यासाठी दुबईमार्गे पाकिस्तानला गेले होते. सीबीआयने असा दावा केला आहे, की कट रचलेल्या बैठकीला अटक करण्यात आलेले चार आरोपी अहमद कमाल शेख उर्फ ​​अहमद लंबू 2017 मध्ये मरण पावलेले दोषी मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान आणि मोहम्मद सलीम उर्फ ​​सलीम कुट्टा उपस्थित होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्याच्या कटाचा भाग म्हणून इतर आरोपींच्या सूचनेनुसार चौघांनी प्रवास केला (1993 Mumbai serial blasts case) होता.

81 पानांचे आरोपपत्र : 12 मार्च 1993 रोजी झालेल्या स्फोटांनंतर 2-3 दिवसांनी मोहम्मद डोसाच्या सांगण्यावरून आरोपी अबू बकर खानसह रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे फरार आरोपी शब्बीर कादरी याच्या घरी गेला. आणि उरलेली शस्त्रे नष्ट केली, असा दावाही सीबीआयने केला आहे. त्यात म्हटले आहे की, ते या प्रकरणाचा तपास सुरू ठेवतील. आणि मागील चाचण्यांमध्ये आतापर्यंत नोंदवलेल्या सर्व पुराव्यांवर अवलंबून राहण्याची परवानगी मागितली आहे. 81 पानांच्या आरोपपत्रात पंच साक्षीदारांचे जबाब, लंबू, खान आणि सलीम यांच्या कबुली जबाबाचा समावेश (Mumbai Blasts Case) आहे.

12 बॉम्बस्फोट : 12 मार्च 1993 रोजी मुंबई शहरामध्ये 12 बॉम्बस्फोट झाले होते. ज्यात 257 ठार आणि 713 जखमी झाले होते. यापूर्वी या खटल्यात दोन वेळा सुनावणी झाली आहे. 1994 ते 2006-07 पर्यंत याकुब मेमन आणि अभिनेता संजय दत्त यांच्यासह 123 आरोपींवर विशेष टाडा न्यायालयासमोर खटला चालवण्यात आला होता. 2017 मध्ये सहा जणांना दुसऱ्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले होते. 2018 मध्ये अटक करण्यात आलेल्या अहमद लंबू आणि मोहम्मद फारूख यांच्याविरुद्धचा खटलाही सध्या प्रलंबित (Serial Blasts Case)आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.