ETV Bharat / state

Bawankule Reaction : अंतर्मनातून शरद पवार कधीच मोदींवर टीका करू शकत नाहीत - चंद्रशेखर बावनकुळे

author img

By

Published : Aug 17, 2023, 4:37 PM IST

Chandrashekhar Bawankule Criticizes
चंद्रशेखर बावनकुळे यांची टिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. तर आता भाजपवर टीका करणारे शरद पवार यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेश अध्यक्षपदी विराजमान झाल्यास एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानिमित्ताने त्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवारांपासून राज ठाकरेंपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शरद पवार अंतर्मनातून कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करू शकत नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




अजित दादांना हाकलून लावायचे का : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, शरद पवारांनी मोदींवर बोलण्यापेक्षा स्वतः आत्मपरीक्षण करावे. त्यांचा कार्यकाळ व आता मोदींचा कार्यकाळ यांची तुलना त्यांनी करून पाहावी. अंतर्मनातून पवार कधीच मोदींवर टीका करणार नाहीत. देश पुढे नेण्यासाठी मोदींना साथ द्यावी लागणार आहे. अजित पवार व त्यांच्या लोकांवर ७० हजार कोटींचे आरोप होत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. अजित पवार आम्हाला साथ द्यायला, सहकार्य करायला पुढे आले असतील तर त्यांना दारातून हाकलून द्यायचे का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला.


फोडाफोडीचे राजकारण केले नाही : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप इतरांच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून त्यांना पक्षात घेत आहे असा आरोप केला आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजप कोणालाही जबरदस्ती पक्षात आणत नाही. १९८४ ला दोन जागा भाजपच्या होत्या. त्या आज ३०३ वर गेल्या आहेत. मागच्या वीस वर्षात भाजपाचा आलेख वाढतच आहे. आम्ही कोणाच्या घरी जाऊन जबरदस्ती कार्यकर्ते आणत नाही.

१९८४ ला २ जागा भाजपाच्या होत्या त्या आज ३०३ वर गेल्या आहेत. पक्षवाढीसाठी संवाद व प्रवास महत्त्वाचा आहे. आम्ही कोणाच्या घरी जाऊन जबरदस्ती कार्यकर्ते आणत नाहीत. आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष

फोडाफोडीचे राजकारण केले नाही : पक्षवाढीसाठी संवाद व प्रवास महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या ५ वर्षाच्या काळात जे काम केले त्याने जनता त्यांना मानते. सर्वपक्षीय नेते त्यांना मानतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व व कर्तुत्वावर जनतेला विश्वास आहे. आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकारण केले नाही. म्हणून राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल असे बोलणे बंद करावे. आम्ही कधीही बेइमानी करत नाही. बेईमानी आमच्यासोबत झाली आहे. राज ठाकरे आमचे चांगले मित्र पण त्यांनाही त्यांचा पक्ष पुढे न्यायचा आहे म्हणून ते आमच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देणे हे आमचे काम असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.



७८ आमदार तेलंगाणा व मध्यप्रदेश दौऱ्यावर : यावर्षाच्या अखेरीस राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा, मिझोराम व मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानिमित्ताने
तेलंगाणा व मध्यप्रदेशमध्ये भाजपाचे महाराष्ट्रातील ७८ आमदार जाणार असून, ७ दिवसाच्या दौऱ्यावर हे तेलंगाणा व मध्यप्रदेशमधील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा दौरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. Bawankule On Uddhav Thackeray: बावनकुळेंची ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका; म्हणाले उद्धव ठाकरेंची स्थिती ही मनोरुग्णासारखी...
  2. Bawankule on Devendra Fadnavis birthday : देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करणार - चंद्रशेखर बावनकुळे
  3. Bawankule Criticized Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर टीका करून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत- बावनकुळे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.