ETV Bharat / state

Kochhar Couple CBI Custody : चंदा कोचर आणि दीपक कोचर तीन दिवसाची सीबीआय कोठडी

author img

By

Published : Dec 24, 2022, 7:19 PM IST

आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना सोमवारपर्यंत 3 दिवसांची सीबीआय कोठडी (Kochhar Couple CBI Custody) सुनावण्यात आली आहे. 2009 मध्ये 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात (Videocon loan scam case) दोघांना अटक झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. मुंबई सीबीआय कोर्टात (Kochhar Couple in Mumbai CBI Court) हजर करण्यात आले. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. (Mumbai Crime) ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरू असून सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली (money laundering allegations) ही अटक झाली होती. (Latest news from Mumbai)

Kochhar Couple CBI Custody
कोचर दाम्पत्य

मुंबई : सीबीआयने आज मुंबईतील विशेष सत्र न्यायालयमध्ये चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) यांना दिल्लीवरून अटक केली होती. यानंतर मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टात (Kochhar Couple CBI Custody) हजर केले. त्यावेळेस सीबीआयच्या वतीने वकील ऍड. ऐ. लिंबोसीन यांनी युक्तिवाद करताना कोचर दांपत्यांची तीन दिवसाची सीबीआय कोठडीचे मागणी केली होती (Kochhar Couple in Mumbai CBI Court). याला कोचर यांच्या वतीने युक्तिवाद करणारे वरिष्ठ वकील अमित देसाई यांनी विरोध केला होता. न्यायालयाने तीन दिवसाची सीबीआय कोठडी दिली आहे. (money laundering allegations)


आज अटकेची कारवाई : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मोठा हादरा बसला असून सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज दिले गेले होते. यातील 2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते आणि 2017 मध्ये ते बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले गेले होते. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली.

नियमबाह्य कर्जमंजुरी आली अंगलट : चंदा कोचर यांनी बँकेचे धोरण आणि नियम मोडून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे एक भागधारक अरविंद गुप्ता यांनी याबाबत पत्र लिहून पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे तक्रार केली होती. 1984 मध्ये ट्रेनी व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झालेल्या चंदा कोचर यांचा यशाचा आलेख चढता राहिला. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट बिझनेस हेड, मुख्य वित्त अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक बनल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.