ETV Bharat / state

ख्रिसमस, नववर्ष स्वागताला कोकण आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 11:50 AM IST

Central Railway Special Trains : नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष स्वागतासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान 14 विशेष ट्रेन चालवल्या जाणार असल्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आलाय.

central railway special trains good news for those going to goa and kokan for christmas and new year
ख्रिसमस, नववर्ष स्वागताला कोकण आणि गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबई Central Railway Special Trains : नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून पनवेल ते मडगावदरम्यान 14 विशेष मेल-एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत. तसंच या विशेष रेल्वे 22 डब्यांसह धावणार आहेत. त्यामुळं ट्रेनमध्ये प्रवाशांना सीटची कमतरता भासणार नाही.


पनवेल- मडगाव-पनवेल विशेष रेल्वे : गाडी क्रमांक 1427, 22 ते 31 डिसेंबरदरम्यान आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी सकाळी आठ वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. (गाडी क्रमांक 1428) परतीचा प्रवास सकाळी आठ वाजता सुरू होईल. दरम्यान, या रेल्वेच्या विशेष 12 फेऱ्या असतील.

गाडी क्रमांक 1429 आणि 1430 : गाडी क्रमांक 1430 मडगाव-पनवेल विशेष गाडी मडगाव येथून 1 जानेवारीला रात्री नऊ वाजता सुटणार आहे. तर ही गाडी पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांला पोहोचणार आहे. तर गाडी क्रमांक 1429, 2 जानेवारीला पनवेल-मडगाव विशेष एक्स्प्रेस सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे. तर ही गाडी मडगाव येथे त्याच दिवशी रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल. ही रेल्वे रोहा ,खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी इत्यादी रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या गाड्यांच्या 2 फेऱ्या असतील.

अधिक माहितीसाठी येथे साधावा संपर्क : यासंदर्भातील अधिक तपशिलासाठी प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देऊन आपले रेल्वे तिकीट बुक करावे.

हेही वाचा -

  1. कसारा-इगतपुरी दरम्यान घसरलेली मालगाडी सकाळी पुन्हा रुळावर; वाहतूक सुरळित
  2. राजधानी एक्सप्रेसमध्ये चोरीचे 82 मोबाईल हस्तगत; पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतलं ताब्यात
  3. धुळे-मुंबई एक्सप्रेस इंजिन कसारा-वशिंद दरम्यान फेल; मध्य रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड त्रास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.