ETV Bharat / state

Terrorist Attack on Mumbai: मुंबई अलर्ट मोडवर; 'तो' संशयीत अटकेत, परंतु धोका कायम

author img

By

Published : Feb 28, 2023, 2:02 PM IST

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच सावट असल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात आला होता. या संदर्भात एनआयएकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेला एक संशयित मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त काल प्रसारित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्या संशयित इसमाला अटक करण्यात आली आहे. परंतु धोका कायम असल्याचे केंद्रीय यंत्रणांनी व्यक्त केला आहे. कारण सरफराज मेनन नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आले असले, तरी हीच ती व्यक्ती आहे का, याचे नाव वापरून दुसरे कुणी यामागे आहे, याबाबत संशय अजूनही कायम आहे.

terrorist attack on Mumbai
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच सावट

मुंबई : मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी या शहराची ओळख आहे. एकेकाळी अंडरवर्डची या मुंबईवर नजर होती. राजकारण्यांची नजर तर असतेच आणि दहशतवाद्यांची नजर देखील असते. हे 26- 11 च्या हल्ल्यात आपण पाहिलेले आहे. मात्र, पुन्हा एकदा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचे वृत्त होते. त्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएने गुप्त माहितीच्या आधारे संशयित दहशतवादी सरफराज मेननला इंदूरमधून अटक करण्यात आली आहे.

सरफराज मेनन मुंबईत : प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांना एका ईमेलद्वारे मुंबईवरील दहशदवादी हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, आधी पाकिस्तान मग चीन आणि नंतर हाँगकाँग या शहरात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेला सरफराज मेमन नावाचा एक प्रशिक्षित व्यक्ती मुंबई शहरात आलेला होता. त्यामुळे एनआयएकडून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा मेसेज देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित व्यक्ती सरफराज मेनन हा मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असून एनआयएने त्या व्यक्तीचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट मुंबई पोलिसांना ईमेलद्वारे पाठवले आहेत. परंतु त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील चौकशी महाराष्ट्र एटीएस करणार आहे.


एनआयएला आला मेल : सरफराज मेननबाबत तपास यंत्रणांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, या महिन्याच्या सुरुवातीला एनआयएला एका अज्ञात व्यक्तीकडून एक मेल आला होता. ज्यामध्ये संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने आपण तालिबान सदस्य असल्याचा दावा केला होता. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. एनआयएने मुंबई पोलिसांना या घडामोडींची माहिती दिली, त्यानंतर महाराष्ट्रातील विविध शहरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.



मागील काही दिवसांत मुंबई रडारवर? मागील काही दिवसांचा रेकॉर्ड पाहता मुंबईला सातत्याने धमक्यांचे फोन येत असल्याचे दिसून येते. मुंबई दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे यातून दिसून येते. आपण पाहिले तर, गेल्या महिन्यात मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा फोन आला होता, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने शाळा उडवून देण्याची धमकी दिली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला धमकीचा कॉल आला होता, ज्यात धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाने हॉस्पिटल उडवून देण्याची आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : Bombay High Court: भाजपा मंत्र्यावर केवळ टीका केली म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याची अटक बेकायदेशीर- मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.