ETV Bharat / state

सीए असलेल्या तरुणाने केली आत्महत्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 7:05 AM IST

Mumbai Suicide News : मुंबईत बँकेत काम करणाऱ्या सीए असलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Suicide News
तरुणाने केली आत्महत्या

मुंबई Mumbai Suicide News : आयसीआयसीआय बँकेत सीए असलेल्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना करी रोड येथील सुखकर्ता इमारतीत घडली आहे. ही घटना १६ जानेवारीला घडली असून आज तरुणाचा मृतदेह त्याच्या पालकांकडे देण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अमन गुप्ता (वय २७) असे असून तो गेल्या सात-आठ महिन्यापासून करी रोड येथील सुखकर्ता इमारतीत इतर दोन मुलांसह राहत असल्याची माहिती, काळाचौकी पोलीस ठाण्याचे (Kalachowki Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिलीय.

आयसीआयसीआय बँकेत होता नोकरीस : काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मध्य प्रदेशात राहणारा अमन गुप्ता (वय २७) हा गेल्या सात आठ महिन्यापासून मुंबईत राहण्यास आला होता. करी रोड येथील सुखकर्ता इमारतीतील ५ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५०९ मध्ये अमन गुप्ता हा त्याच्या दोन इतर मित्रांसोबत राहत होता. तसेच अमन गुप्ता हा आयसीआयसीआय बँकेच्या ट्रेझरी ऑफिसमध्ये नोकरीस होता. १६ जानेवारीला त्याचा रूममधील मित्र बिपिन कुमार शर्मा (वय 26) आणि दुसरा मित्र मयूर झाडे (वय 26) हे दोघेजण सकाळी 08.00 ते 08.30 वाजण्याच्या सुमारास नोकरी करता ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी अमन गुप्ता हा रूममध्येच झोपलेला होता.

गळफास घेऊन केली आत्महत्या : बिपीन आणि मयूर हे दोघेजण सायंकाळी 7.30 वा. ते 08.00 वाजाताच्या सुमारास ते राहत असलेल्या रूमच्या दरवाज्याजवळ आले असता त्यांनी बेल वाजवली. मात्र, रूमचा दरवाजा आतमधून लावलेला होता. कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तेथील इतर लोकांच्या मदतीने पोलीस हेल्पलाइन क्रमांक 100 वर कॉल करून मदत मागितली. त्यानंतर त्यांनी रूमचा दरवाजा लाथा मारून तोडला. तेव्हा आतमध्ये त्यांचा मित्र अमन गुप्ता हा गळफास घेतल्याचं दिसलं. त्यानंतर तेथे तात्काळ काळाचौकी पोलीस दाखल झाले आणि उपचारासाठी पोलीस गाडीतून अमन गुप्ताला केईएम हॉस्पिटल येथे नेले. मात्र, केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी अमनला तपासून रात्री १०. १२ वाजेच्या सुमारास मृत मयत घोषित केले. यावरून काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिमकार्ड केले नष्ट : त्यानंतर अमनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या पालकांना देण्यात आल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेटे यांनी दिलीय. शेटे यांनी पुढे सांगितलं की, मृत अमनकडे सुसाईड नोट सापडली नाही. तर त्याच्या मोबाईलवरून तपास सुरु आहे. त्याने मोबाईलमधील सिमकार्ड नष्ट केले असून मोबाईलला फिंगर लॉक आहे. अमनच्या दहा बोटांच्या ठशाने फिंगर लॉकी ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल ओपन न झाल्याने मोबाईलमधील तपशील पाहता आला नाही. तरी आता अमनच्या मोबाईल क्रमांकाद्वारे सीडीआर काढून त्याने शेवटची कोणाशी बातचीत केली होती हे कळेल. अद्याप अमनने आत्महत्या का केली याचं कारण समजू शकलं नाही.

हेही वाचा -

  1. एकाच कुटुंबातील पाच जणांची सामूहिक आत्महत्या, मृतामध्ये तीन मुलांचा समावेश
  2. पालकांनो मुलांना जपा, १९ वर्षीय मुलीनं तणावातून केली आत्महत्या
  3. चहावाल्याच्या आत्महत्येला सहा महिन्यानंतर वेगळं वळण, सहा जणांविरोधात गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.