ETV Bharat / state

PMC Bank Scam Case : पीएमसी बँक घोटाळा; आरोपी राकेश वधावनचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 10:50 PM IST

PMC Bank Scam Case : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी राकेश वधावन (Rakesh wadhawan) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) दणका दिला आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात अटकेत असलेले राकेश वधावन यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.

PMC Bank Scam Case
पीएमसी बँक घोटाळा प्रकरण

मुंबई PMC Bank Scam Case : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील प्रमुख आरोपी राकेश वधावन (Rakesh wadhawan) त्याचं वय वर्ष 70 आहे. वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अर्ज केला होता. तो मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे (Bharati Dangre) यांच्या एक सदस्य खंडपीठाने हा जामीन फेटाळून लावलेला आहे. यासंदर्भातला आदेशाची प्रत नुकतीच न्यायालयाने जारी केली.


आर्थिक बेकायदेशीर घोटाळाचा आहे आरोप : 2019 यावर्षीपासून राकेश वधावन हा तुरुंगात आहे. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक यातील मनी लॉन्ड्री प्रकरणांमध्ये ते तुरुंगात आहे. मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये त्यांना तुरुंगात ठेवलं आहे. त्यानी वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता. (HDIAL) हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचे ते प्रमुख असून, त्याच्यावर हजारो कोटी रुपयांचा आर्थिक बेकायदेशीर घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याच्या वैद्यकीय आधारावर जामीनाचा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत एक परिचारिका आणि फिजिओथेरपीस डॉक्टर त्यांच्यावर तुरुंगातच उपचार करतील असे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहे.


न्यायालयाकडे केली विनंती : 26 ऑक्टोबर 2023 रोजी राकेश वधावन यांनी उच्च न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर नुकतीच सुनावणी झाली. ते 70 वर्षाचे आहेत. ज्या तुरुंगामध्ये ते राहतात तिथे पलंगामुळे त्याच्या शरीराला काही इजा झालेली आहे. आधीच त्यांना विविध आजार आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळावा. तो जामीन वैद्यकीय कारणांच्या आधारे मागत असल्यामुळे न्यायालयाने त्याचा विचार करावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.

वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीन नाही : राकेश वधावन याच्या वकिलांनी न्यायालयामध्ये जे जे सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल देखील सादर केला होता. त्यात त्याच्यावर फिजिओथेरपिस्ट आणि इतर माध्यमातून उपचार ठेवण्यासंदर्भातल्या सूचना करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने आदेशात म्हटलं की, अहवालाच्या आधारे गंभीर खटला असल्यामुळे सध्या तरी वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीन देता येत नाही. परंतु औषधोपचार तुरुंगामध्ये मिळू शकतो.

हेही वाचा -

पीएमसी बँक घोटाळ्यात आणखी एक शिवसेनेचा नेता? भाजपाची चौकशीची मागणी

पीएमसी बँक घोटाळा : वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

पी एम सी बँक घोटाळा : आरोपी मेहुल ठाकूरचा विदेशात जाण्यासाठीचा अर्ज, कोर्टाने निर्णय ठेवला राखून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.