ETV Bharat / state

ICICI Bank Scam Case: कोचर दांपत्याच्या याचिकेवर उच्च न्यायालय 9 जानेवारी रोजी देणार निर्णय

author img

By

Published : Jan 6, 2023, 7:32 PM IST

आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सीबीआयच्या कारवाई विरोधातील कोचर यांच्या याचिकेवर (Kochhar couple petition) आज सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात आज न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी पार पडली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल 9 जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे.

ICICI Bank Scam Case
कोचर दांपत्य

मुंबई: आयसीआयसीआय बँक घोटाळाप्रकरणी (ICICI Bank Scam Case) न्यायालयीन कोठडीत असलेले कोचर दाम्पत्यांनी (Kochhar couple petition) सीबीआय विरोधात न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने निकाल 9 जानेवारीपर्यंत राखून ठेवला आहे.

कोचर दाम्पत्याचा आरोप : मुंबई सत्र न्यायालयाकडून कोचर दांपत्यांला 10 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. 15 जानेवारीला त्यांच्या मुलाचे लग्न असतानाही तपासयंत्रणेने त्यांना ठरवून अटक केल्याचा कोचर दाम्पत्याने आरोप केला आहे. ईडीच्या प्रकरणात चंदा कोचर यांच्या कस्टडीची गरज नसल्याचे कोर्टात स्पष्ट केले आहे. 19 वेळा कोचर यांनी ईडी चौकशीला हजेरी लावलीय असेही सांगण्यात आले. कोचर दांपत्याच्या बाजूने ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि विक्रम चौधरी यांनी युक्तीवाद केला.

कोचर दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत : कोचर दाम्पत्याला सीबीआयने 24 डिसेंबर रोजी रात्री उशिरा दिल्ली येथून अटक केल्यानंतर 29 डिसेंबर 2022 रोजी विशेष न्यायालयाने कोचर दाम्पत्यासह वेणूगोपाल धूत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान विशेष सीबीआय न्यायालयाने सुनावलेली कोठडी बेकायदा असल्याचा दावा करत तातडीने सुटका करण्याची मागणी करणारी याचिका कोचर दांम्पत्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पी. के चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


सुनावणी दरम्यान काय घडलं? 15 जानेवारीला कोचर दांपत्यांच्या मुलाचे लग्न आहे. लग्न पत्रिकाही वाटण्यात आल्या असून अन्य घरगुती कार्यक्रमही होणार आहेत, असे असतानाही कोचर दाम्पत्यांना सीबीआयने ठरवून अटक केली असल्याचा आरोप कोचर दाम्पत्यांकडून ज्येष्ठ वकील अँड. विक्रम चौधरी आणि वकील अँड. अमित देसाई यांनी केला. तसेच ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अँटर्नी जनरल यांनी चंदा कोचर यांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते असे अँड. विक्रम चौधरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ईडीसमोर 19 वेळा कोचर या चौकशीसाठी हजर झाल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.


आजच्या युक्तीवादातील प्रमुख मुद्दे : चंदा कोचर यांचे वकील अॅड अमित देसाई यांनी युक्तीवादात सांगितले की, CBI ने चंदा कोचर यांना 14 वेळा चौकशीसाठी बोलावले. प्रत्येक वेळी चंदा कोचर यांनी तपासात सहकार्य केले तरी देखील त्यांना अटक करण्याची गरज काय होती ? असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, चंदा कोचर यांनी सुरुवाती पासूनच तपास यंत्रणाना सांगितलं आहे की दीपक कोचर यांच्या व्यवसायाचा व्यवहार बाबत त्यांना काहीच माहिती नाही. CBI नं अटक केलेल्या कालावधीत तपासात कोणतीही प्रगती केली. चंदा कोचर यांचा अरेस्ट मेमो, कायद्यानुसार नाही तसेच महिला अधिकारी असल्याचा कोणताही उल्लेख नाही. चंदा कोचर या जबाबदार नागरिक आहेत त्या आतापर्यंत 14 जबाब नोंदवले गेले. आवश्यक ती सर्व कागदपत्र दिली त्यांनी तपासासाठी दिली आहेत. दरम्यान, संपूर्ण तपासात त्यांनी सातत्याने सहकार्य केले आहे. यामुळे चंदा कोचर यांची अटक बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

अटक बेकायदेशीर : दीपक कोचर यांचे वकिल अॅड. विक्रम चौधरी यांनी सांगितले की, दीपक कोचर यांची अटक बेकायदेशीर आहे कारण सहकार्य न केल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली आहे. CBI चा असा आरोप असला तरी त्यांनी सहकार्य केलं नाही, याबाबत कोणताही खुलासा नाही. यामध्ये सहकार्य कुठे आणि का केलं नाही ? याबाबत CBI नं, कधीच आणि कुठेही स्पष्ट केलं नाही. यामुळे तपासात सहकार्य केल्याचा दावा खोटा आहे. वकिल विक्रम चौधरी यांनी थेट सीबीआयच्या तपासवरच जोरदार हल्ला केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.