ETV Bharat / state

अग्निशमन दलात खासगीकरण; कंत्राटी पद्धतीने चालकांची भरती

author img

By

Published : Feb 6, 2021, 5:49 AM IST

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील बहुतांश पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात आता जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी ५४ खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जाणार आहेत.

अग्निशमन दलात खासगीकरण
अग्निशमन दलात खासगीकरण

मुंबई - आग लागणे, इमारत, घरे कोसळने, पाण्यात बुडणे आदी सर्वच कामांसाठी मुंबई अग्निशमन दलास पाचारण केले जाते. मात्र, मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील बहुतांश पदे रिक्त असल्याने अग्निशमन दलात आता जीप, कार आदी वाहने चालविण्यासाठी ५४ खासगी कंत्राटी ड्रायव्हर नेमले जाणार आहेत. मात्र यावरून आगामी स्थायी समितीत वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

६६५ पदे असूत १५८ पदे रिक्त -

मुंबई अग्निशमन दलात यंत्रचालक संवर्गाची ६६५ पदे असून यापैकी १५८ पदे रिक्त आहेत. आपत्कालीन परिस्थितीत दलाचे कर्मचारी पंप ऑपरेट करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे प्रक्षिशित यंत्रचालकांना जीप व कार चालवण्यास तैनात केल्यास आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. काळबादेवी येथे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार अग्निशमन दलातील रुग्णवाहिका व जीप व कार चालवण्यासाठी खासगी वाहक भरती केली जाणार आहेत.

कंत्राटदाराकडून नोकर भरती -
पालिका रिक्त जागा भरण्याऐवजी खासगी कंत्राटदाराकडून नोकर भरती करणार आहे. अग्निशमन दलात एकूण ६६५ यंत्रचालक संवर्गाची पदे आहेत. परंतु, अनुभवी चालक मिळत नसल्याने दोन वर्षासाठी ५४ कंत्राटी चालक ८४ वाहन चालवण्याकरिता घेतले जाणार आहेत. ५ कोटी ९७ लाख ८७ हजार रुपये यावर खर्च केला जाणार आहे. मे. के एच एफ एम हॉस्पिलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेसला अटी आणि शर्तीवर हे काम दिले जाणार आहे. अग्निशमन पदावर काम करणाऱ्या उमेदवाराकडे पाच वर्षाचा अनुभव आणि १ वर्ष अवजड वाहने चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

अशी असेल अट -
उंची - १६५ सें.मी
वजन - ५० किलो
दृष्टी - चष्मा नसावा
वयोमर्यादा - २१ ते ४५ वर्ष
शैक्षणिक अर्हता - १० वी उत्तीर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.