ETV Bharat / state

Ambadas Danve About BJP: महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या चार किंवा पाच जागा मिळतील - अंबादास दानवे

author img

By

Published : Aug 10, 2023, 8:00 PM IST

Updated : Aug 10, 2023, 8:48 PM IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून निदर्शने, आंदोलने केली जात आहेत. भाजप महिला मोर्चाकडून मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे. किरीट सोमैया यांच्या व्हिडिओचे काय झाले असा थेट सवाल विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. यासह लोकसभा निवडणुकीत भाजपला चार किंवा पाच जागा मिळतील, असा दावा देखील दानवे यांनी केला आहे.

Ambadas Danve About BJP
अंबादास दानवे

भाजपबद्दल अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

मुंबई : संसदेत काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अशोभनीय कृत्य केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मुंबई भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करत निदर्शने करण्यात आली. राहुल गांधींविरोधात भाजप करत असलेल्या आंदोलनावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे. किरीट सोमैयांचा व्हिडिओ मी स्वतः विधान परिषद उपसभापतींना दिला आहे. सोमैया यांच्या व्हिडिओचे काय झाले, असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांना शिकवण्याची गरज नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.

भाजपच्या 4 किंवा 5 जागा येतील : वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे समोर येत आहेत. ज्यामध्ये भाजपला सर्वांत जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजप मिशन 45 त्यानुसार तयारीला लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला 45 नाही तर 55 जागा मिळणार, असे म्हणायला देखील ते चुकणार नाहीत. त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे मला वाटत नाही. 45 मधून जनता त्यांना 4 किंवा 5 जागांवर नेऊन ठेवेल. माझ्या म्हणण्यानुसार 4 किंवा 5 जागा भाजपच्या येतील, असा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे.




तीन तोंडी सरकार : सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे सरकार तीन तोंडाचे आहे. याला एक तोंड नाही. या सरकारला डबल इंजिन, ट्रिपल इंजिनचे सरकार म्हणतात. खाते वाटपासाठी देखील कितीवेळ लागला हे आपण पाहिले आहे. आता पालकमंत्र्यांसाठीसुद्धा दिल्लीत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघे मिळून मुजरे आणि हुजरे करावे लागणार. मग पालकमंत्रीबाबत काय निर्णय करणार? असा टोला दानवे यांनी सरकारला लगावला आहे.



शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरू : मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे देशाला शरमेने मान खाली घालावी लागली. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बलात्कार, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून मुली आणि महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप युवती सेनेकडून करण्यात आला आहे. या सेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन राज्यात महिला सुरक्षतेबाबत ठोस पावले उचलावी आणि राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणी निवेदन देत केली आहे. योग्य तो तोडगा निघाला नाही तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना युवतीच्या शीतल देवरुखकर, राजुर पाटील, धनश्री कोळगे इतर महिला पदाधिकारी आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.

हेही वाचा:

  1. Amol Kolhe On Narendra Modi : सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
  2. Kalavati Bandurkar : अमित शाह खोटारडे, मला मदत राहुल गांधींमुळेच मिळाली; जाणून घ्या कोण आहेत कलावती बांदूरकर?
  3. Tushar Gandhi On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर कारवाई का नाही, उपमुख्यमंत्र्यांचे पाय कुणी बांधून ठेवलेत; तुषार गांधींचा सवाल, तक्रार दाखल
Last Updated : Aug 10, 2023, 8:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.