ETV Bharat / state

भाजप 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना शिंदे गटासोबत लढणार - बावनकुळे

author img

By

Published : Nov 14, 2022, 11:57 AM IST

Updated : Nov 14, 2022, 5:17 PM IST

भाजप 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना (शिंदे गट) सोबत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवेल. लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे.

बावनकुळे
बावनकुळे

पुणे - भाजप 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना (शिंदे गट) सोबत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवेल. लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे. बावनकुळे यांची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी इतरही मुद्यांवर मते मांडली.

उद्धव ठाकरे पवारांच्या ट्रॅपमध्ये अडकले - राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या डायसला फक्त चार लोक राहतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विधान केले जात आहे. गजानन कीर्तीकर यांना जावे लागते हे वाईट आहे. तसेच पवार ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकले आणि त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले. 2024 ला चारच लोक राहतील. चांगले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. असे बावनकुळे म्हणाले.

भारत जोडो यात्रेचं लोकांना देणघेणं नाही - भारत जोडो यात्रेबाबत बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या यात्रेचा काही परिणाम झाला नाही. राहुल गांधी यांच्या यात्रेचे लोकांना काही घेणे देणे नाही. पहिले फोटो अन आताचे फोटो पाहा. तेच ८०० कार्यकर्ते कायम त्या यात्रेत आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. चित्रा वाघ यांच्याविषयी बोलताना, त्यांनी संवेदनशील उत्तर दिले पाहिजे असे बावनकुळे म्हणाले. वाघ यांचा व्हिडीओ पाहायला हवा. असे व्हायला नको होते. महाविकास आघाडी सरकारनेच राठोड यांचे सगळे बंद केले होते, असे देखील यावेळी बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Last Updated : Nov 14, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.