ETV Bharat / state

भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट

author img

By

Published : Nov 24, 2019, 9:31 PM IST

राणा जगजीतसिंह पाटील

पाटील हे अजित पवार यांचा संदेश मुख्यमंत्र्यांकडे तर घेऊन गेले नसतील ना, अशी चर्चा सध्या होत आहे. कारण पाटील हे फक्त भाजपचे आमदार नसून अजित पवार यांचे नातेवाईकसुद्धा आहेत.

मुंबई- महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. शनिवारी देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे.आज दिवसभर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबादचे आमदार जगजीतसिंह पाटील यांनी आज अजित पवार यांच्या चर्चगेट येथील प्रेमकोर्ट या निवास्थानी त्यांची भेट घेतली.

प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील

अजित पवार आणि जगजीतसिंह यांच्यात तब्बल ४ तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. पाटील यांनी मात्र या सर्व चर्चेवर बोलण्यास नकार दिला व ते दादर येथील भाजपच्या बैठकीसाठी निघून गेले. पाटील हे अजित पवार यांचा संदेश मुख्यमंत्र्यांकडे तर घेऊन गेले नसतील ना, अशी चर्चा सध्या होत आहे. कारण पाटील हे फक्त भाजपचे आमदार नसून अजित पवार यांचे नातेवाईकसुद्धा आहेत.

हेही वाचा- सुप्रिया सुळे यांचे नवीन व्हॉट्सअॅप स्टेटस...

Intro:मुंबई।

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. काल भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे.आज दिवसवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. अजित पवार यांच्या चर्चगेट येथील प्रेमकोर्ट या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबादचे आमदार जगजीतसिंह पाटील यांनी पवार यांची आज भेट घेतली. त्यांच्यात तब्बल 4 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पाटील यांनी मात्र या सर्व चर्चवर बोलण्यास नकार दिला व ते दादर येथील भाजपच्या बैठकीसाठी निघून गेले. पाटील हे पवार यांचा काही मेसेज तर घेऊन गेले नसतील ना मुख्यमंत्र्यांकडे अशी चर्चा सध्या होत आहे. कारण पाटील हे फक्त भाजपचे आमदार नसून अजित पवार यांचे नातेवाईक सुद्धा आहेत.Body:|Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.