ETV Bharat / state

lok Sabha Election: लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर

author img

By

Published : Jun 8, 2023, 10:50 PM IST

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा - शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Chandrashekhar Bawankule
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : विधानसभेसाठी २०० पेक्षा जास्त जागा व लोकसभेसाठी मिशन ४५ हे भाजपने अगोदरच ठरवले असून, त्या अनुषंगाने त्यांनी सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ व २८८ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. याप्रसंगी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत. तसेच मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात, नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे.



नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न : पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतो, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.




असे आहेत निवडणूक प्रमुख : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आमदार राहुल कुल, पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ, मुंबई उत्तरसाठी आमदार योगेश सागर, मावळसाठी आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई दक्षिणसाठी मंत्री मंगल प्रभात लोढा, नाशिकसाठी केदा आहेर, रत्नागिरी साठी प्रमोद जठार आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar सरकारने ठरविले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता अजित पवार
  2. Maharashtra Politics आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार बहुमताने जिंकणार दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा
  3. Prithviraj Chavan On Modi पंतप्रधान मोदींची देशभरातून जादू घटली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाजपवर टीकास्त्र
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.