ETV Bharat / state

Big relief to Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवरील फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे रद्द

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 5:11 PM IST

रश्मी शुक्लांवरील फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे रद्द
रश्मी शुक्लांवरील फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे रद्द

Big relief to Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवरील फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे रद्द करण्यात आलेत. मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा त्यामुळे शुक्ला यांना मिळाला आहे.

मुंबई Big relief to Rashmi Shukla : देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असल्याने त्यांनी काही नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते. त्यात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याप्रकरणी त्यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणात आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने त्यांच्यावरील दोन्ही गुन्हे रद्द केलेत. यामुळे रश्मी शुक्लांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रश्मी शुक्ला यांना दिलासा - मविआ सरकार सत्तेत असताना फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर दोन FIR नोंदवण्यात आले होते. त्यातील एक गुन्हा पुण्यात नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी नोंदवण्यात आला. तर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी मुंबईतील कुलाबा येथे दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पुणे प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. त्यामुळे एकदा क्लोजर रिपोर्ट आला की दिलासा मिळतो अशी चर्चा न्यायालयीन वर्तुळात सुरू होती. यातच आज उच्च न्यायालयात यावर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती ए. एस. गडकरी, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी पुणे व मुंबई कुलाबा प्रकरणात गुन्हा रद्द करत रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला आहे. यामुळे त्यांच्यामागे चौकशीचा फास आता संपल्यात जमा झालयं. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याबाबत सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर झाला होता. त्यामुळे सीबीआयने कोर्टाला केस बंद करण्याची विनंती केली होती. अखेर न्यायालयाने आज दोन्ही गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिल्याने रश्मी शुक्ला यांना खूप मोठा दिलासा मिळाला असून एफआयआर दाखल करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मनाला जात आहे.

शुक्ला यांना अखेर क्लीन चिट - मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाणे येथे याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाने यापुढील तपास केला. हा गुन्हा नंतर सीबीआय कडे वर्ग केल्यानंतर सीबीआयकडून या गुन्ह्याचा तपास केला जात होता. मात्र आता सीबीआयने न्यायालयात न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांच्यासमोर तपास बंद करण्याबाबत विनंती केली होती. आज सुनावणीत न्यायालयाने गुन्हे रद्द केल्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी रश्मी शुक्ला यांना अखेर क्लीन चिट मिळालीय.

हेही वाचा...

  1. VIDEO फोन टॅपींग प्रकरणावर बोलू न दिल्यामुळे विरोधकांचा सभात्याग
  2. Phone Tapping Case : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीमुळे रश्मी शुक्लांना क्लिन चिट, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट
  3. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट, कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.