ETV Bharat / state

Honey Babu : हनी बाबू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा; खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

author img

By

Published : Dec 16, 2022, 8:41 PM IST

दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक तसेच भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या हनी बाबूंना उपचारासाठी परवानगी मिळाली आहे. मुंबईतील सेफी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याकरिता परवानगी दिली ( Honey Babu surgery at Safi Hospital ) आहे. त्याचा संपूर्ण खर्च हनी बाबू यांनाच करावा लागणार आहे.

High Court
उच्च न्यायालय

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक हनी बाबू यांनी ( Bhima Koregaon case accused Honey Babu )अंतरिम वैद्यकीय जामीनासाठी उच्च न्यायालयात याचिका धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हनी बाबू यांना मुंबईतील सेफी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याकरिता परवानगी दिली ( Honey Babu surgery at Safi Hospital ) आहे. त्यामुळे हानी बाबूं ना मोठा दिलासा मिळाला आहे.

खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी : हनी बाबू यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रियेसह पोटाचे विकार आणि हाडांशी संबंधित आजारावर मुंबईतील सैफी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे युक्तिवाद वकील युथ चौधरी यांनी सुनावणी दरम्यान केला ( Honey Babu Suffered From Diseases ) होता. या खाजगी रुग्णालयात होणाऱ्या वैद्यकीय खर्च हा आरोपी हनी बाबू यांना स्वतः करावा लागणार आहे. तसेच यावेळी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांचा देखील खर्च यांनाच करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. आरोपी हनी बाबू यांच्या उपचारावर NIA कडून उत्तर देण्यात आले होते. मात्र NIA ने यास विरोध केला होता. न्यायालयाने आज खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता परवानगी देण्यात आली आहे. तसेच शनिवारी पोलीस संरक्षणामध्ये आरोपी हनी बाबू यांना मुंबईतील सेफी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात यावे असे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिले आहे.

मोतीबिंदूमुळे दृष्टी जाण्याचा धोका : आरोग्यशी संबंधित समस्यांवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगीसाठी कारागृह अधिक्षक आणि विशेष न्यायालयात अर्ज दाखल कला होता. मात्र काहीह प्रतिसाद मिळाल नाही. मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावत असून आपल्याला पोटदुखी आणि गुडघे दुखीचाही त्रास होत आहे. गुडघ्यातून होणाऱ्या वेदना असह्य आहेत. त्यामुळे दैनंदिन कामे करण्यासही अडचणींचा सामाना करावा लागत आहे. या तिन्ही समस्यांसंदर्भात तातडीने चाचणी करण्यासाठी आणि उपचार सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बाबू यांनी याचिकेतून केली आहे. वैद्यकीय चाचणीसाठी बाबू यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला देण्यात यावेत अशी मागणी त्यांच्यावतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाकडे केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील संदेश पाटील यांनी वैद्यकीय चाचणीच्यावेळी बाबू यांच्या नातेवाईकांनी उपस्थित असण्यावर आक्षेप घेतला.



काय आहे प्रकरण : पेशव्यांचे मराठा सैन्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. या युद्धात पेशव्यांविरोधात ईस्ट इंडिया कंपनीबरोबर महार रेजिमेंट लढली होती. यात बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती. त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. या हिंसाचाराला एक दिवस अगोदर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदे तील वक्तव्ये कारणीभूत होती. अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला. या एल्गार परिषदे मागे माओवादी संघटनांचा हात होता असं म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत. या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.