ETV Bharat / state

Beauty Tips : फ्रेश लूक मिळवण्यााशिवाय डोळ्यांखालचे डार्क सर्कल्सही कमी करा

author img

By

Published : Oct 19, 2022, 5:30 PM IST

दिवाळीपर्यंत फ्रेश लूक मिळवायचा असेल आणि चेहरा तजेलदार व्हावा वाटत असेल तर तुम्ही आत्तापासूच त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी अनेक जणींचे घरगुती उपाय करणे सुरु झालेच असणार. पम तरीही वापरलेल्या वस्तूंचे प्रमाण किती असावे यासाठी गाईडेंसची गरज असतेच. त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करत ( Dark Circles )आहोत.

Beauty Tips
Beauty Tips

मुंबई : दिवाळी आता अवघ्या आठवडाभरावर आली आहे. घरगुती उपाय करूनही आयब्रोज, फेशियल किंवा क्लिनअप अशा ब्यूटी ट्रिटमेंट्स घेऊन चेहरा तर स्वच्छ होतो. पण डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचे ( Dark Circles ) काय करावे, त्यांना कसे लपवावे हे समजत नाही. म्हणूनच आम्ही सांगितलेला एक घरगुती उपाय करून बघा. आठवडाभरात डार्क सर्कल्स तर कमी होतीलच पण डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्याही ( fine lines or wrinkles ) कमी होण्यासाठी मदत होईल.

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हाेममेड क्रिम : डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हाेममेड क्रिम ( Homemade Dark Circles Cream) वापरले जातात. हे घरगुती क्रिम अनेक प्रकारे तयार केले जातात. क्रिम तयार करण्यासाठी आपल्याला ४ पदार्थांची गरज लागणार आहे. १ टेबलस्पून गुलाब जल, १ टेबलस्पून मध , १ टेबलस्पून काकडीचा रस, १ टेबलस्पून बटाट्याचा रस, १ व्हिटॅमिन ई कॅप्सून, १ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल वापरला जातो.

कसे तयार करायचे डार्क सर्कल्स क्रिम ? : डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हाेममेड डार्क सर्कल्स क्रिम कशी बनवावी ( How to Make Dark Circles Cream ) हे आपण पाहणार आहोत. डार्क सर्कल्स कमी करण्याची क्रिम तयार करण्यासाठी एक काचेची वाटी घ्या. त्यात वरील सर्व पदार्थ मिक्स करा. ते सर्व पदार्थ व्यवस्थित एकीजव करा. त्यानंतर काचेची बाटली घ्या. ती स्वच्छ पुसून घ्या. त्यात ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्या.

डार्क सर्कल्स क्रिम कसे लावावे? : डार्क सर्कल्स क्रिम कसे लावावे हे ( How to Apply Dark Circles Cream ) पाहूयात. काचेच्या बाटलीत भरून ठेवलेली ही क्रिम तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा. पुढील ७ दिवस क्रिम तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता. आठवडा भरापर्यंत ती क्रिम फ्रेश राहू शकते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी ही क्रिम डोळ्यांभाेवती लावून हलक्या हाताने डोळ्यांना मसाज करा. आठवडाभरातच डार्क सर्कल्स आणि डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या कमी झाल्याचे जाणवेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.